उमरेड येथे होणार दिवाणी न्यायालय

By Admin | Updated: June 8, 2017 06:35 IST2017-06-08T06:35:57+5:302017-06-08T06:35:57+5:30

दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासह Þ१९ पदांची निर्मिती करण्यास बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Umarad will be the Civil Court | उमरेड येथे होणार दिवाणी न्यायालय

उमरेड येथे होणार दिवाणी न्यायालय

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्यांसाठी दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासह Þ१९ पदांची निर्मिती करण्यास बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्यांतील नागरिकाची मोठी सोय होणार आहे. या न्यायालयात नागपूरच्या दिवाणी न्यायालयातील (वरिष्ठ स्तर) २०८४ प्रकरणे हस्तांतरित होणार आहेत. प्रस्तावित दिवाणी न्यायालयासाठी उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेनुसार १९ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच पहारेकरी तथा सुरक्षारक्षक व सफाईगार या पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेण्यात येतील.

Web Title: Umarad will be the Civil Court