अखेर ‘विक्रांत’वर हातोडा
By Admin | Updated: November 22, 2014 03:22 IST2014-11-22T03:22:43+5:302014-11-22T03:22:43+5:30
भारत-पाकिस्तान युद्धात गौरवाशाली कामगिरी करणाऱ्या विक्रांत युद्धनौकेवर अखेर हातोडा पडला.

अखेर ‘विक्रांत’वर हातोडा
मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धात गौरवाशाली कामगिरी करणाऱ्या विक्रांत युद्धनौकेवर अखेर हातोडा पडला. गुरुवारपासून रे रोड येथील दारुखान्यात विक्रांत भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू राहणार आहे.
भारत-पाकिस्तान युद्धात गौरवशाली कामगिरी केल्यावर ३१ जानेवारी १९९७ साली ही युद्धनौका नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाली. त्यानंतर या नौकेचे कायमस्वरूपी संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार होते. नौदलानेही त्यावर संग्रहालय साकारून लोकांसाठी ते खुलेही केले. मात्र देखभाल आणि दुरुस्तीसाठी येणारा कोट्यवधींचा खर्च पाहता ती भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आणि २0१२ साली ती लोकांसाठी बंद केली. एका आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने विक्रांतला ६३ कोटींना विकतही घेतले. मात्र भंगारात निघणाऱ्या विक्रांतला वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने विक्रांतला भंगारात काढण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु विक्रांत बचाव समितीकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली व न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर स्थगितीही दिली.(प्रतिनिधी)