सदानंद नाईक,उल्हासनगर: ऑपरेशन सिंदूर या मोहिमेत भारतीय सैन्य दलाने दाखवलेले शौऱ्याचा गौरव करण्याच्या हेतूने शहर काँग्रेस कमिटीच्या राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित तिरंगा रॅलीचे व शाहिद झालेल्या जवानाना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले. शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.
उल्हासनगर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवाऱी ऑपरेशन सिंदूर या मोहिमेत भारतीय सैन्य दलाने दाखवलेले शौऱ्याचा गौरव म्हणून बुधवारी सकाळी ११ वाजता कॅम्प नं-२ मधील सपना गार्डन, राजीव गांधी उद्यान येथून रॅली काढण्यात आली. सर्व प्रथम राजीव गांधी उद्यानातील समाज हॉल येथे स्वर्गीय राजीव गांधी यांना आदरांजली देण्यात आली. तसेच सर्व वीर शहीदाना व आतिरेकी हल्ल्यातील मृतुमुखी झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर तिरंगा हातात घेऊन, भारत माता की जयच्या घोषणा देत रैली काढण्यात आली.
शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे, पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे, पदाधिकारी किशोर धडके, महिला अध्यक्षा मनीषा महाकाळे, आशाराम टाक, श्याम मढवी, डॉ हितेश साचवणी, कुलदीप ऐलसिंहांनी, फमीदा सय्यद, पुष्पलता सिंग, उषा गिरी, सिंधुताई रामटेके, वामदेव भोयर, आबा साठे, निलेश जाधव, राजेश फक्के, बापू पगारे, विद्या शर्मा, मालती गवई, राजकुमारी नारा, ईश्वर जगियाशी, देव आठवले, अन्सार शेख, दीपक गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.