उल्हासनगरमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
By Admin | Updated: January 14, 2017 07:54 IST2017-01-14T07:54:25+5:302017-01-14T07:54:25+5:30
उल्हासनगरमधील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता गुरदीप सिंग याच्यावर २० ते २५ जणांनी तलवारीने हल्ला केला.

उल्हासनगरमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
>ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. १४ - उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरदीप सिंग असे जखमी कार्यकर्त्याचे नाव आहे. काल रात्री उसीरा २० ते २५ जणांनी गुरदीप यांच्यावर तलवार आणि चॉपरने हल्ला केला. गुरदीप या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सेंट्रल हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात उपचार सुरु आहेत. हा हल्ला कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप समजू शकलेले नसून, पोलिस पुढील चौकशी करत आहेत.