...तरच राज्यात राष्ट्रपती राजवट; १६ आमदारांच्या निलंबनाबाबत कायदेतज्ञ उल्हास बापटांची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 06:43 PM2022-06-26T18:43:05+5:302022-06-26T18:45:02+5:30

महाराष्ट्रात निर्माण झालेला परिस्थितीमुळे शिवसेनेने 16 जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. विधानसभा उपाध्यक्षांकडून 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

Ulhas Bapat's reaction regarding the suspension of 16 MLAs | ...तरच राज्यात राष्ट्रपती राजवट; १६ आमदारांच्या निलंबनाबाबत कायदेतज्ञ उल्हास बापटांची प्रतिक्रिया 

...तरच राज्यात राष्ट्रपती राजवट; १६ आमदारांच्या निलंबनाबाबत कायदेतज्ञ उल्हास बापटांची प्रतिक्रिया 

Next

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांनी बंड केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेला परिस्थितीमुळे शिवसेनेने 16 जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. विधानसभा उपाध्यक्षांकडून 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे. यात एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना येत्या 48 उत्तर देण्याचे सांगितले आहे. जर हे 16 आमदार 48 तासांत आले नाही तर उपसभापती या आमदारांना निलंबित करू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे असं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं आहे. 

सत्र चालू झाले आणि तिथे समजा विश्वासाचा ठराव मांडला आणि तो संमत झाला तर त्याचा अर्थ उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल. मग तिथे सगळे नाटक संपते. आणि दुसरा कोणीतरी येईल. जर दुसरं कोणी तयार झाले नाही किंवा बहुमत आले नाही तर  ६ महिन्यांकरिता राष्ट्रपती राजवट येते. या ६ महिन्यांमध्ये निवडणूक आयोगोला निवडणूक घ्यावी लागते असं कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील १५ बंडखोर आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांच्या यादीत असलेले आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच, त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. याशिवाय, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या कार्यालयाला आणि घराला केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे. वैजापूरमध्ये सीआरपीएफचे जवान तैनात झाले असून, त्यांनी बोरनारे यांच्या घराचा ताबा घेतला आहे. तसेच, आज संध्याकाळपर्यंत १५ आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 

Web Title: Ulhas Bapat's reaction regarding the suspension of 16 MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.