चिमुकल्या नेत्यांची आगळी निवडणूक
By Admin | Updated: June 29, 2016 02:20 IST2016-06-29T02:20:33+5:302016-06-29T02:20:33+5:30
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.

चिमुकल्या नेत्यांची आगळी निवडणूक
नवी मुंबई : विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. ऐरोलीतील सेंट झेविअर्स शाळेच्या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क म्हणजे काय आणि निवडणुकीविषयी सविस्तर माहिती मिळावी याकरिता शाळेच्या संसदेची निवडणूक घेण्यात आली.
आवडत्या उमेदवाराला मतदान करत शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदानापूर्वी शाळेच्या आवारात, वर्गात मतदानाविषयी जनजागृती करणारे फलक तसेच मतदान केल्याने नक्कीच बदल घडू शकतो असा संदेश देण्यात आला. यामध्ये पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांनी मतपत्राच्या सहाय्याने मतदान केले तर, सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ई-मतदान केले. योग्य उमेदवार कसा निवडायचा, मतदान प्रक्रिया नेमकी कशी याचीही
माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. (प्रतिनिधी)