शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचा शंखनाद ?; पालघरमध्ये थेट उमेदवाराचीच घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 19:09 IST

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पालघर- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 2019च्या पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी श्रीनिवास वनगांनाच देणार असल्याचा ठाम निर्धार उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला आहे.पालघरमधल्या शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरे बोलत आहेत. यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. साम-दाम-दंड-भेदवाल्यांना सेनेनं घाम फोडला. पैसे वाटणा-यांवर अजून कारवाई का होत नाही. आता नाटकं सुरू आहेत, पिक्चर अजून बाकी आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी येत्या निवडणुकांत युती करणार नसल्याचे संकेत दिले आहेत.पालघर निवडणुकीतील पराभव खिलाडू वृत्तीने नव्हे, तर कोणत्याच परीने मान्य करायला मी तयार नाही. उन्हामुळे जर यंत्र बंद पडत असतील तर मग चाचण्या कसल्या घेतल्या ?, नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली, याला लोकशाही म्हणतात का ?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या जाहीर सभेत उपस्थित केला आहे. किमान सहा लाखांच्या आसपास भाजपाच्या विरुद्ध मतं पडली.पास वाटताना लोक पकडली याला लोकशाही म्हणतात का ?, एका आदिवासी पोराने केलेला हा तर भाजपाचा पराभव आहे, 15 दिवसांत अडीच लाख मते मिळाली, अजून आता आठ महिने आहेत. 2019ला श्रीनिवास वनगा खासदार झालाच पाहिजे. बुलेट ट्रेन, हायवे, बंदर यासाठी कोण काय बोलत पाहू, यांनी जे वादे मतदानावेळी दिले. काल भेटी झाल्या त्यात सांगितलं शिवसेना जनतेच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या समजून घेतल्या. शेतकऱ्यांचा म्हणणं आहे आमचा रस्त्याला विरोध नाही पण आमच्या जमिनी जात आहेत आयुष्य उधवस्थ होतंय. अनेकांनी जमिनी न देण्याबाबत सांगितलं. रक्त शिंपल्याशिवाय लोकशाही कळत नाही का, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018