शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उद्धव ठाकरेंकडील शिवसेना पक्षप्रमुखपद बेकायदेशीर; निवडणूक आयोगासमोर मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 17:55 IST

उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत केलेला बदल बेकायदेशीर आहे. कायद्याच्या निकषानुसार शिंदे गटाची बाजू योग्य आहे असं जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर सांगितले.

नवी दिल्ली - शिवसेना कुणाची अन् धनुष्यबाण कुणाचा याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी शिंदे-ठाकरे गटाने आयोगासमोर युक्तिवाद केला. त्यात शिंदे गटाच्या वकिलांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदावर प्रश्नचिन्ह उभे केले. शिवसेनेची जुनी घटना बाळासाहेब ठाकरें केंद्रीत आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत बेकायदेशीर आणि बोगस बदल केले असा दावा महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर मांडला. 

या युक्तिवादात महेश जेठमलानी म्हणाले की, शिवसेनेची जुनी घटना ही बाळासाहेब ठाकरेंभोवती केंद्रित होती. जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून राष्ट्रीय कार्यकारणीत निवड करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी बोगसपणे घटनेत बदल केला. उद्धव ठाकरेंनी स्वत:कडे अधिकार ठेवणे हे बेकायदेशीर आहे. शिवसेना पक्षप्रमुख पद उद्धव ठाकरेंनी स्वत:कडे ठेवले. शिंदे यांची राष्ट्रीय कार्यकारणीत निवड झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या पदाला अर्थ नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत केलेला बदल बेकायदेशीर आहे. कायद्याच्या निकषानुसार शिंदे गटाची बाजू योग्य आहे. उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही. पक्षप्रमुख पद निर्माण करणे बेकायदेशीर होते. असं म्हणत जेठमलानी यांनी शिवसेनेची पक्ष घटना निवडणूक आयोगासमोर वाचून दाखवली. त्यानंतर शिंदे गटाचे दुसरे वकील मणिंदर सिंग यांनी आयोगासमोर भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टात सुनावणी असेपर्यंत निकालासाठी घाई नको. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे बोगस आहेत असा प्रतिदावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. 

ठाकरे गटाचीच कागदपत्रे बोगसपहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय जे आमचे आहे ते खरे आहे. ५ ऐवजी ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाची ठाकरे गट मागणी करतायेत ते वेळकाढूपणा करतायेत. ठाकरे गटाचे मुद्दे चालणार नाहीत. आमच्याकडे ४० आमदार, १३ खासदार, जिल्हाप्रमुख, गटप्रमुखापर्यंत शपथपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. ठाकरे यांनीच सादर केलेली कागदपत्रे बोगस आहेत असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले यांनी केला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग