शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 21:19 IST

Maharashtra Election 2024 : तीस वर्षांपासून शिवसेनेत काम करणाऱ्या हारुन खान यांना यंदा उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे.

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचाच अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच, शिवसेना (उबाठा) पक्षाचे एकमेव मुस्लिम उमेदवार हारुन खान यांनी रविवारी (17 नोव्हेंबर) मंदिरात पोहोचून प्रार्थना केली. त्यांनी शिवलिंगाला जलाभिषेक करुन देवाची आरतीही केली. यावेळी मंदिरातील पुजाऱ्याने त्यांच्या कपाळावर टिळाही लावला. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह आजूबाजूच्या परिसराला भेटी देऊन लोकांशी संवादही साधला.

हारुन खान उद्धव ठाकरेंच्या जवळचे हारुन खान हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. त्याचाच परिणाम म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत हारुन खान यांना संधी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलवून वर्सोव्यातून उमेदवारी दिली. राजकीय दृष्टिकोनातून वर्सोवा ही हायप्रोफाईल जागा आहे. 

30 वर्षांपासून शिवसेनेत वर्सोव्यात सुमारे 1 लाख 10 हजार मतदार आहेत. या भागात हिंदूंसोबत मुस्लिमांची संख्याही मोठी आहे. त्यामुळेच एआयएमआयएम आणि भाजपची रणनीती मोडून काढत उद्धव ठाकरेंनी हारुन खान यांच्यावर पैज लावली आहे. हारुन गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेसाठी प्रामाणिकपणे काम करतात. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या काळातही ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले. त्याचेच फळ आता उमेदवारीच्या रुपात मिळाले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना