मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला?

By Admin | Updated: September 28, 2016 19:54 IST2016-09-28T19:46:30+5:302016-09-28T19:54:42+5:30

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारने विशेष अधिवेशन घेण्याची मागणी उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray's meeting with the demands of the Maratha community tomorrow? | मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला?

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला?

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत ते या भेटीत चर्चा करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. 
 
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारने विशेष अधिवेशन घेण्याची मागणी ते  यावेळी करू शकतात. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून वादग्रस्त व्यंगचित्र छापण्यात आलं होतं. त्यामुळे मराठा समाजामध्ये शिवसेनेविषयी रोष वाढत आहे. त्यामुळेच उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेवून ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चा करून मागण्यांसंदर्भात सरकारने विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करू शकतात. 
 
दरम्यान, वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी सामनामधून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. व्यंगचित्रकार प्रभुदेसाईंकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून यासंबंधी वृत्त आजच्या अंकात छापण्यात आलं आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी केला आहे. 

Web Title: Uddhav Thackeray's meeting with the demands of the Maratha community tomorrow?