शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला 'त्या' नेत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 12:38 IST

नारायण पाटील आणि रश्मी बागल यांना एकत्रित आणण्याच्या प्रयत्न तानाजी सावंत करत आहेत. त्यातूनच पुण्यातील घरी तानाजी सावंत यांनी एकाचवेळी नारायण पाटील आणि रश्मी बागल यांची बैठक घेतली.

सोलापूर - राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. २०१९ मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास ठेवत करमाळ्याची उमेदवारी दिली त्या रश्मी बागल यादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी रश्मी बागल यांनी भेट घेतली त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. 

२०१९ विधानसभा निवडणुकीत रश्मी बागल या करमाळ्यातून शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांच्याविरोधात माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले. त्यावेळी मतात फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय शिंदे आमदार म्हणून निवडून आले. त्यात नारायण पाटील आणि रश्मी बागल यांना एकत्रित आणण्याच्या प्रयत्न तानाजी सावंत करत आहेत. त्यातूनच पुण्यातील घरी तानाजी सावंत यांनी एकाचवेळी नारायण पाटील आणि रश्मी बागल यांची बैठक घेतली. माजी आमदार नारायण पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यात रश्मी बागल यांनाही आपल्या बाजूने करून सोलापुरात राष्ट्रवादीला शह देण्याचा शिंदे गटाचा मानस आहे. 

कोण आहेत रश्मी बागल?रश्मी बागल या दिवंगत माजी सहकार राज्यमंत्री दिगंबरराव बागल यांच्या कन्या आहेत. दिगंबरराव बागल हे शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. दिगंबरराव बागल यांच्या निधनानंतर रश्मी बागल यांच्या आई शामल बागल यांना राष्ट्रवादीनं आमदार केले. २०१४ मध्ये राष्ट्रवादीने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. परंतु २५७ मतांनी त्यांचा पराभव झाला. रश्मी बागल या सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालिकादेखील आहेत. २०१९ मध्ये रश्मी बागल यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी करमाळ्यातून बागल यांना उमेदवारी मिळावी यासाठी तानाजी सावंत आग्रही होते. त्यामुळे बागल यांना उमेदवारी मिळाल्यानंतर नारायण पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यात पाटील-बागल यांच्या मतविभाजनाचा फायदा संजय शिंदे यांना झाला.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे