शेतक-यांच्या आत्महत्येवरुन उद्धव ठाकरेंनी टोचले फडणवीस सरकारचे कान

By Admin | Updated: January 30, 2015 09:29 IST2015-01-30T09:26:45+5:302015-01-30T09:29:07+5:30

राज्यात सरकार बदलले असले तरी विदर्भातील शेतक-यांच्या जीवनात फरक पडल्याचे दिसत नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Uddhav Thackeray's ears from the Takhale Fadnavis government on the suicide of farmers | शेतक-यांच्या आत्महत्येवरुन उद्धव ठाकरेंनी टोचले फडणवीस सरकारचे कान

शेतक-यांच्या आत्महत्येवरुन उद्धव ठाकरेंनी टोचले फडणवीस सरकारचे कान

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - राज्यात सरकार बदलले असले तरी विदर्भातील शेतक-यांच्या जीवनात फरक पडल्याचे दिसत नाही. विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्या सुरु असून हे चित्र विदारक आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

विदर्भात एकाच दिवशी पाच शेतक-यांनी कर्ज, नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. शुक्रवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी शेतक-यांच्या आत्महत्येवरुन फडणवीस सरकारचे कान टोचले. मुख्यमंत्री फडणवीस दावोस येथे उद्योग परिषदेत देशाचे नेतृत्व करत असतानाच विदर्भातील शेतक-यांनी आत्महत्या करुन जीवन संपवावे हे भयंकर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्यावर कर्ज, नापिकी आणि दुष्काळामुळे आत्महत्या करणा-या शेतक-यांचे प्रमाण कमी होईल अशी आशा होती. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. आत्महत्या करणा-या शेतक-यांकडे मोबाईल फोनही नव्हते. त्यामुळे मोबाईल फोनची बिलं भरता पण कर्जाचे हफ्ते फेडत नाही असे या शेतक-यांना विचारता येणार असा टोमणाही ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना लगावला. मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातीलच असताना शेतकरी आत्महत्या करतो हे नवीन सरकारला शोभते का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  

 

Web Title: Uddhav Thackeray's ears from the Takhale Fadnavis government on the suicide of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.