नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 17:38 IST2016-11-11T16:44:53+5:302016-11-11T17:38:20+5:30
500 आणि 1000 रूपयांच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11- 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीका केली. अशाप्रकारे अचानक नोटा रद्द करणं चुकीचं असल्याचं यावेळी उद्धव म्हणाले.
नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे ज्यांनी निवडून दिलं त्यांना त्रास होत आहे, नोटा बदलण्याची मुदत सरकारने वाढवायला हवी अशी मागणी त्यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. तसेच ज्या ठिकाणी सर्वात जास्त काळा पैसा आहे त्या स्वीस बॅंकेवर सर्जिकल स्ट्राईक कधी करणार अशी विचारणाही त्यांनी केली, शिवाय या निर्णयाचा नेत्यांना त्रास होत नसून जनतेला जास्त त्रास होत आहे, जनतेनं सर्जिकल स्ट्राईक केलं तर जड जाईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे-