शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: ‘तुम्ही बरे व्हा, मग आपण वचपा काढू!’ उद्धव ठाकरेंचा जखमी शिवसैनिकाशी संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 19:16 IST

Uddhav Thackeray: कल्याणमध्ये शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला झाला असून, हा हल्ला शिंदे समर्थकांनी केल्याचा आरोप केला जात आहेत. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्ल्यात जखमी झालेल्या हर्षवर्धन पालांडे यांच्याशी फोनवरून संवास साधला असून, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

कल्याण - गेल्या महिनाभरापासून शिवसेनेत घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे गट असे दोन गट पक्षात पडले आहेत. दोन्ही गटातील समर्थकांमध्ये मीडियापासून सोशल मीडियापर्यंत जोरदार वादविवाद होत असून, काही वाद हाणामारीपर्यंत जात आहेत. दरम्यान कल्याणमध्ये शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला झाला असून, हा हल्ला शिंदे समर्थकांनी केल्याचा आरोप केला जात आहेत. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्ल्यात जखमी झालेल्या हर्षवर्धन पालांडे यांच्याशी फोनवरून संवास साधला असून, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन पालांडे यांच्यात फोनवरून झालेलं संभाषण आता समोर आलं आहे. यावेळी त्यांच्यात असा संवाद झाला. ’जय महाराष्ट्र, कसे आहात तुम्ही?’’काही नाही साहेब, त्यांनी माझ्यावर हल्ला केला. कसं काम करतो, जास्त पुढे पुढे करतो, तुला बघतो म्हणत हल्ला केला.’’आता जास्त बोलू नका. व्यवस्थित आहात ना?’’हो साहेब, व्यवस्थित आहे.’ ’आपण त्याचा वचपा घेऊ नंतर. त्याची काळजी करू नका. आधी व्यवस्थित बरे व्हा. मी पण येईन तिकडे.’ ‘मला तुमचे आशीर्वाद पुरेसे आहे. जय महाराष्ट्र’ 

कल्याण पूर्वेतील संतोषी माता रस्त्याने गाडीतून जात असताना हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. तलवार व लोखंडी रॉडने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या हल्ल्यात हर्षवर्धन पालांडे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हर्षवर्धन पालांडे यांच्यावरील हल्ला एकनाथ शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र महेश गायकवाड यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. ही घटना दुर्देवी असून या घटनेशी माझा काही संबंध नाही, असे महेश गायकवाड यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेkalyanकल्याण