‘रिफायनरीबाबत उद्धव ठाकरे लवकरच भूमिका मांडतील’
By Admin | Updated: May 17, 2017 00:43 IST2017-05-17T00:43:48+5:302017-05-17T00:43:48+5:30
जैतापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला आहे. आता राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्धव
‘रिफायनरीबाबत उद्धव ठाकरे लवकरच भूमिका मांडतील’
- लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जैतापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला आहे. आता राजापूर तालुक्यात
होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे लवकरच आपली भूमिका जाहीर करतील,
असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी रत्नागिरीत केले.
विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे मंगळवारी रत्नागिरी, लांजा तालुक्यांच्या दौऱ्यावर आले होते. कार्यक्रमांदरम्यान त्यांनी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला.