उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत - राणे

By Admin | Updated: September 14, 2014 20:00 IST2014-09-14T19:49:59+5:302014-09-14T20:00:33+5:30

उद्धव ठाकरे हे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे. महायुतीकडे मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारच नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray will not be the chief minister - Rane | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत - राणे

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत - राणे

ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. १४ - विधानसभा निवडणुकीतील बिगूल वाजताच काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचा निर्णय जाहीर झाला नसतानाही काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी १७ सप्टेंबर रोजी जाहीर करु अशी घोषणा काँग्रेसचे नेते व निवडणूक प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी केली आहे. 
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १५ ऑक्टोंबरला राज्यात निवडणूक होणार आहे. निवडणूक महिनाभरावर आली असली तरी अद्याप काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना - भाजप महायुतीतील जागावापट ठरलेले नाही.जागावाटप जाहीर झाल्यावर उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याने उमेदवारांना प्रचाराला फारच कमी अवधी मिळेल असे दिसत होते. मात्र काँग्रेसने यावर तोडगा काढत १७ सप्टेंबरला पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिली आहे.  कणकवली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे हे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. महायुतीकडे मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारच नाही असेही राणे यांनी म्हटले आहे.

Web Title: Uddhav Thackeray will not be the chief minister - Rane