शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: शिंदे गटाला धक्का, ज्याची ढाल केली, तिच सरन्यायाधीशांनी काढून घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 13:29 IST

ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी ठाकरे गटाच्या दाव्यांची हवा काढली, नंतर सरन्यायाधीशांनी शिंदे गटाच्या गोटाची हवा काढली. तीन महत्वाच्या टिपण नोंदविल्या. पुढे दावा यावरच चालणार...

शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्र याचिकेवरील सुनावणीचा आज सलग दुसरा दिवस होता. गेल्या ६ महिन्यांपासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे प्रलंबित आहे. आज ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी ठाकरे गटाच्या दाव्यांची हवाच काढून टाकली आहे. परंतू, सरन्यायाधीशांनी थेट शिंदे गटाच्या गोटातील हवा काढून टाकल्याने महाराष्ट्रातील या सत्तासंघर्षात मोठी चुरस निर्माण झाली आहे.

शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवी, महेश जेठमलानी तर ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल कोर्टात बाजू मांडत आहेत. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देता नये होता. त्यांनी राजीनामा का दिला? त्य़ांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ होता. त्यामुळे ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला अर्थ उरत नाही. त्यामुळे १६ आमदारांमुळे सरकार पडले हे सिद्ध होत नाही. आमची याचिका १६ आमदारांची होती. इतर २२ आमदारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे साळवे यांनी आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. तसेच ठाकरे गटाचे विधानसभेतील गटनेते अजय चौधरी यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. अजय चौधरी यांचं गटनेतेपद हे बेकायदेशीर आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षावर बैठक बोलावली होती. या बैठकीला फक्त 14 आमदार उपस्थित होते, यामुळे बहुमत नव्हते, असे साळवे म्हणाले. 

दोन्ही बाजुंचा युक्तीवाद-प्रतिवाद ऐकल्यानंतर सरन्यायाधीशांनी तीन महत्वाच्या टिपण्या नोंदविल्या. अरुणाचलच्या नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला शिंदे गटाकडून सातत्याने कोर्टात दिला जात होता. रेबिया प्रकरण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासाठी लागू होत नाही हे कोर्टात सिब्बल यांनी काल पटवून दिले होते. यावर सरन्यायाधीशांनी नबाम रेबिया प्रकरण बाजुला ठेवून या प्रकरणाकडे पाहुया असे म्हटले. यामुळे शिंदे गट ज्या प्रकरणाची ढाल करत होते, तेच आता बाजुला झाले आहे. 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: उद्धव ठाकरे आपल्याच फेऱ्यात अडकणार? साळवेंनी बोट ठेवले, सिब्बल गडबडले...

याचबरोबर विधानसभा उपाध्यक्षांना शिंदेंसोबत गेलेल्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार नव्हता का? यावर अध्यक्षांच्या अधिकाराबाबत दहाव्या सुचीचा विचार करावा, असे सांगत चंद्रचूड यांनी समसमान मते असताना विधानसभा अध्यक्षांना मतदानाचा अधिकार असतो, यामुळे त्यांनी निष्पक्षपणे भूमिका घेण्याचे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. यामुळे मविआच्या आणि शिंदे-भाजपाच्या विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकांवर देखील सरन्यायाधीशांनी कटाक्ष टाकण्याचे ठरविले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना