शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

...त्यांचं रक्षण करणे हे तुमचं हिंदुत्व का?; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदेसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 13:49 IST

माझ्या हिंदुत्वाची व्याख्या तरी आहे पण भाजपाच्या हिंदुत्वाची व्याखा काय हे तरी त्यांनी सांगावे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला लगावला. 

मुंबई -  एकनाथ शिंदेंची शिवसेना नाही तर गद्दार सेना आहे. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचं रक्षण करणं म्हणजे तुमचं हिंदुत्व आहे का असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मातोश्रीवर काँग्रेसमधून बाहेर पडलेले अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी शिवसेना संपवली असं एकनाथ शिंदेंना वाटतं परंतु माझ्यासोबत माझी जुनी माणसं राज्यभरात आहे. उत्तर प्रदेशातही काही पदाधिकारी मशाल हाती घेऊन संघटनांसाठी बैठक घेतायेत तेदेखील माझ्यासोबत आहेत. आज किरण काळेसारखे लढवय्ये कार्यकर्ते आमच्यासोबत येत आहेत. राज्यात आणि देशात अंदाधुंद कारभार माजला आहे त्यांना दूर करून आपलं हिंदुत्व, राष्ट्रीयत्व करणे ही जबाबदारी आहे. निवडणूक काळात अनेक रेवड्या देऊन जनतेला फसवलं गेले आहे आता त्या रेवड्या उघड्या पडायला लागल्यात असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय धर्म जगायचा असतो, तो सांगायचा नसतो हे गाडगे महाराजांनी शिकवलं. ते मी मुख्यमंत्री काळात पाळलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही दुसऱ्या धर्माचा द्वेष करा हे शिकवले नाही. जे या देशाला आपलं मानतात ते आपलेच, ज्यांनी हा धर्माचा खेळखंडोबा केला आहे त्यांचं राजकारणापुरतं मुस्लीम प्रेम कसं आहे याचं मी दाखल्यासह सांगू शकतो. अगदी काल परवा मोदींचे थोरले की धाकटे बंधू हे कोण आहेत ते त्यांनी दाखवले आहे. त्यांच्याबद्दल फार प्रेमाने, आपुलकीने ट्विट केले आहे. निवडणुकीसाठी जी काही धर्मांधता माजवतायेत हे देशासाठी योग्य आहे असं मला वाटत नाही.  धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचे रक्षण करणे हे भाजपाचं हिंदुत्व आहे का? माझ्या हिंदुत्वाची व्याख्या तरी आहे पण भाजपाच्या हिंदुत्वाची व्याखा काय हे तरी त्यांनी सांगावे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला लगावला. 

दरम्यान, न्यायलयाने तत्परता दाखवणे गरजेचे आहे. आमच्या खटल्यात ३ वर्ष होऊन गेली तरी अद्याप निकाल लागला नाही. परंतु माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत निकाल लागलाय तर किमान त्याची प्रत तरी सन्माननीय राहुल नार्वेकरांना द्यावी अशी कुणी मागणी केली गैर काय..न्यायालयाच्या निर्णयाचा मान सन्मान राखत असतील तर त्यांनी आमच्याबाबतीत जो काही निर्णय दिला तो विचित्र आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

मर्सिडीजमधून फिरणाऱ्यांनी लाडक्या बहि‍णींचे पैसे का दिले नाहीत?

एक महिला म्हणून त्यांचा आदर आहे. राजकारणात त्यांनी त्यांचे चांगभलं केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर फार बोलणार नाही मात्र स्वत: मर्सिडिजमधून फिरणाऱ्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे का दिले नाहीत हे सांगावे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या आरोपावर भाष्य केले. तर महिला आघाडीचा विरोध असताना उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंना ४ वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली, त्यांनी उद्धव ठाकरे यांना ८ मर्सिडीज दिल्या का याचे उत्तर द्यावे. त्या मर्सिडीज दिल्याचा पावत्या असतील तर त्या दाखवा असं आव्हान संजय राऊतांनी नीलम गोऱ्हेंना केले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे