शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

Uddhav Thackeray:"रिफायनरी गुजरातला न्या, वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या’’, उद्धव ठाकरेंचा खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 14:34 IST

Uddhav Thackeray: हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता फॉक्सकॉर्न, गिफ्ट सिटी आणि एअरबस प्रकल्प परत महाराष्ट्राला द्या, असा खोचक सल्ला दिला. 

बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज बारसू, सोलगाव आणि आजाबाजूच्या गावांचा दौरा केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा प्रकल्प पुढे रेटण्यासाठी बळाचा वापर करत असलेल्या सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता फॉक्सकॉर्न, गिफ्ट सिटी आणि एअरबस प्रकल्प परत महाराष्ट्राला द्या, असा खोचक सल्ला दिला. 

उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, गेल्या काही काळात चांगले प्रकल्प गुजरातला गेले. तर वाईट प्रकल्प येथे आणले जात आहेत. मात्र स्थानिकांचा विरोध असेल तर हा रिफायनरी प्रकल्प कोकणात व्हायला नको. हा प्रकल्प चांगला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा प्रकल्प इतकाच चांगला असेल तर त्यासाठी पोलीस बळाचा वापर का केला जात आहे. सरकारकडून होत असलेली दडपशाही पाहता या प्रकल्पामध्ये काहीतरी काळंबेरं असल्याची शंका येते, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, इतके प्रकल्प बाहेर नेले. आता हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या. आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या. कोकणात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी हे अजिबात चालणार नाही. इथल्या पर्यावरणाची हानी करून आम्हाला प्रकल्प नको. या प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यापेक्षा लोकांसमोर जा. उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरांवर वरवंटा फिरवताना लाज वाटत नाही का, अशी घणाघाती टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीमध्ये आल्यानंतर उपस्थितांशी थोडक्यात संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की, मी प्रकल्पासाठी पत्र लिहिलं होतं. मात्र लोकांवर जबरदस्ती करून प्रकल्प करा असं मी म्हटलं नव्हतं. हुकूमशाहीच्या माध्यमातून हा प्रकल्प लादू नका. राज्य सरकारने हुकूमशाही करून हा रिफायनरी प्रकल्प येथे लादण्याचा प्रयत्न केला. तर  आम्ही महाराष्ट्र पेटवू. आज मी इथे येऊन उभा आहे. आता जे या प्रकल्पाचं समर्थन करत आहेत. त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त बाजूला ठेवून समोर या आणि रिफायनरीचं समर्थन करून दाखवावं, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार