शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

"उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढला"; प्रकाश आंबेडकरांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 12:36 IST

खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

Prakash Ambedkar on Shiv Sena : शिवसेना पक्ष कुणाचा या वादावरुन गेल्या अडीच वर्षापासून राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये दावे प्रतिदावे केला जात आहे. दोन्ही पक्षाचे प्रमुख आणि नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे विधान केले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना मिळालेल्या यशावरुन प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं.

खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तर उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा मुस्लिम समाजामुळे वाढल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. मात्र आता प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर ठाकरे गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील स्ट्राईक बघितला तर शिंदेचा स्ट्राईक रेट डबल आहे. शिवसेनेची मते ही एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसैनिक खरी शिवसेना मानत आहे. उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षण आणि मुस्लिम समाजामुळे वाढला आहे," असं  प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

"प्रकाश आंबेडकर हे विद्वान आहेत. पण त्यांची प्रज्ञा नेहमी नेहमी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या हरवलेली असते. ती अशीच हरवते म्हणून प्रकाश आंबेडकर कायमचे राजकारणात वंचित राहिले आहेत.  दुसऱ्याच्या पायात खोडा घालणं एवढंच त्यांचे काम आहे. स्वतः एकही जागा जिंकू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे याबाबत आश्चर्य आहे. कदाचित त्यांचे डोळे उघडले तर महाराष्ट्राच्या विकासासाठी हातात हात देऊन पुढे जाणे, क्षणभर थोडं मागे राहणे आणि अट्टाहास न करणे, त्याग करणे ही मूलभूत तत्वे त्यांनी स्विकारली तर खूप काही घडू शकतं," असे अरविंद सावंत यांनी म्हटलं.

राज ठाकरेंवर टाडा लावला पाहिजे - प्रकाश आंबेडकर

"महाराष्ट्रातील माणूस हा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो. मध्यप्रदेश गुजरात मध्येही राहतो. त्यांचं काय करायचं? त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे वक्तव्य आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यांना युएपीए आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा ताबडतोब लागला पाहिजे. अशा व्यक्तींना सरळसरळ टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न बघता अशांना आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. त्यामुळे ही हिम्मत सरकारने दाखवावी," असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना