शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray : "अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी?"; उद्धव ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 13:48 IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूर्वी गँगवॉर दोन गटांमध्ये व्हायचं, आता सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे असं म्हणत निशाणा साधला आहे. 

मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. याच दरम्यान, हल्लेखोर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूर्वी गँगवॉर दोन गटांमध्ये व्हायचं, आता सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. "अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मात्र ज्याने हत्या केली त्यानेही नंतर आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं दिसतंय तेवढं सोपं दिसत नाही आहे. सूड भावनेतून माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. त्याने टोकाचं पाऊल उचललं असेल तर त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न राहतो."

"अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसचा फेसबुक लाईव्हचा व्हिडीओ समोर आला. यात गोळ्या झाडताना दिसतं. पण कोण झाडतंय हे दिसत नाही. मॉरिसने बॉडीगार्डच्या शस्त्रातून गोळ्या चालवल्या. त्या गोळ्या खरंच त्याने चालवल्या की, आणखी कोणी चालवल्या? त्या दोघांना मारण्याची सुपारी आणखी कोणी दिली होती का? हा एक मोठा प्रश्न मनात आहे" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

"आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही, पूर्वीच्या राज्यपालांसोबत त्यांचे फोटो आहेत. माजी राज्यपाल कोश्यारी य़ांच्यासोबत या गुंडाचा सत्कार करताना फोटो आहे. असे गुंडांचे सत्कार राज्यपालांच्या हातून होत असतील, तर कुणाकडे दाद मागायची? कोरोनाच्या काळात ‘मास्क घालणे’ हा उपचार होता, तसा सध्या या सरकारला ‘मत न देणं’ हा त्यावर उपचार आहे. मी मुख्यमंत्री असताना ज्या वेळी पोलिसांवर आरोप झाले, त्यावेळी मी खंबीरपणे महाराष्ट्र पोलिसांसोबत उभा राहिलो होतो" असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणAbhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकरShiv Senaशिवसेना