शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Chandrashekhar Bawankule: "उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढावी अन्...", चंद्रशेखर बावनकुळेंचा सणसणीत टोला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 11:36 IST

उद्धव ठाकरेंनी स्वत:चा पक्ष संपवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या सर्व त्यांनी केल्या आहेत.

उद्धव ठाकरेंनी स्वत:चा पक्ष संपवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या सर्व त्यांनी केल्या आहेत. आता त्यांनी एक काम करावं निवडणूक आयोगात जावं आणि काँग्रेस पक्षाच्या घटनेची झेरॉक्स कॉपी काढावी. तिच आपल्या पक्षाची घटना करुन टाकावी एवढंच बाकी राहिलं आहे, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक होणार आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर असं नवं समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी या युतीवर टीका केली. "मागासवर्गीय समाज ही काही कुणाही जहागीर नाही. जो जनतेसाठी काम करतो जनता त्याच्या मागे असते. इथं जात वगैरे पाहिली जात नाही. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार लोकांचं काम करत आहे. त्यामुळे कोणतीही युती-आघाडी झाली तरी शिंदे-फडणवीस युतीला तोड नाही", असं बावनकुळे म्हणाले. 

सीमा प्रश्नावर नरमाईची भूमिका नाहीमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर शिंदे-फडणवीस सरकारनं नरमाईची भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप बावनकुळे यांनी फेटाळून लावला. "सीमावादावर कोणतीही नरमाईची भूमिका नाही. गेल्या ६५ वर्षात सीमाभागात विकास झालेला नाही. त्यामुळे तिथल्या लोकांना वाटतं की जे सरकार चांगल्या सुविधा देतं ते आपलं. शिंदे-फडणवीस सरकारनं याच मुद्द्यावर लक्ष केंद्रीय तरुन सीमाभागात सुविधांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे", असं बावनकुळे म्हणाले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे