शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा बोलू नये, वेळेप्रसंगी आम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 11:18 IST

आमदारांच्या मतदारसंघात जाणीवपूर्वक राष्ट्रवादीकडून त्रास दिला जात आहे. आमदार अस्वस्थ आहेत हे कित्येकदा उद्धव ठाकरेंना सांगितले होते.

मुंबई - पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ४० आमदार जे एकमताने उठाव करतात त्यांना पालापाचोळ्याची उपमा देणे हे योग्य नाही. पक्ष वाढवण्यासाठी या आमदारांनी योगदान दिले आहे. वेळेप्रसंगी संघर्ष केला आहे. संजय राऊतांची भाषा उद्धव ठाकरे बोलतायेत. हे बोलू नका. तुमच्याबद्दल आदराची भावना आहे अशा शब्दात आमदार शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाष्य केले आहे. 

शंभुराज देसाई म्हणाले की, आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांमधील खदखद उद्धव ठाकरेंच्या कानी घातली होती. आमदारांच्या मतदारसंघात जाणीवपूर्वक राष्ट्रवादीकडून त्रास दिला जात आहे. आमदार अस्वस्थ आहेत. किमान ५ ते १० वेळा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. ही आमच्या मनातील खदखद होती असं त्यांनी सांगितले. तसेच बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना वाचवण्याचं काम आम्ही केले. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरुष आहे. त्यांना एका कुटुंबापुरतं मर्यादित करू नये. बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण देशाचे हिंदुह्द्रयसम्राट आहेत असंही त्यांनी म्हटलं. 

"उद्धव ठाकरेही शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही; एकवेळ तुम्हाला विसरू, पण..."

शिवसेनाप्रमुख तुम्हीही होऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरे हे देशाचे नेते आहे. बाळासाहेब ठाकरे मोठे झाले ते उद्धव ठाकरेंना पाहावत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत त्यांचे फोटो, पुतळा तुमच्या स्टेजवर नको असं कुणी म्हटलं तर काय होईल. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने, पुण्याईने आम्ही मोठे झालो. तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमचा ठसा उमटवा. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे ही माणसं खूप मोठी आहेत. शिवसेनाप्रमुखांनी छत्रपतींना नमस्कार केल्याशिवाय भाषणाला सुरूवात केली नाही. शिवसेनाप्रमुखांना छोटे करण्याचा प्रयत्न करू नका असं विधान आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. त्याचसोबत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेही होऊ शकत नाही. आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या पायाजवळ राहू. शिवसेनाप्रमुखांची बरोबरी करण्याची आमची लायकी नाही. एकवेळ तुम्हाला विसरू पण शिवसेनाप्रमुखांना विसरता येणार नाही असा घणाघात आमदार संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv Senaशिवसेना