उद्धव ठाकरे सहा आॅगस्टला रोह्यात

By Admin | Updated: August 3, 2016 02:47 IST2016-08-03T02:47:05+5:302016-08-03T02:47:05+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन रोहा तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray in Roha on 6th August | उद्धव ठाकरे सहा आॅगस्टला रोह्यात

उद्धव ठाकरे सहा आॅगस्टला रोह्यात


रोहा : रोहा शहरातील डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहासमोरील मोकळ्या जागेत विस्तीर्ण मंडपात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन रोहा तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. शनिवार, ६ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या सभेला भविष्यातील नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याने महत्त्व प्राप्त झाले आहे.
खासदार अनंत गीते यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आकांक्षा ट्रस्टमार्फत इ. ८ वीच्या विद्यार्थ्यांना ५ हजार टॅब वाटप यावेळी करण्यात येणार आहे. उध्दव ठाकरे यांच्या हस्ते फिरता दवाखाना असणाऱ्या मोबाइल व्हॅनचे लोकार्पण होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तसेच अतुल सोबती, सीएमडी भेल, आदेश बांदेकर, संपर्क प्रमुख रायगड जिल्हा, आ. भरत गोगावले, आ. मनोहर भोईर तसेच प्रकाश देसाई, रवी मुंढे, किशोर जैन, यांच्यासह जिल्हाभरातील १५ हजार शिवसैनिक उपस्थित राहतील, असा अंदाज सेनेचे रोहा तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सभेमुळे तेथील भाजी विक्रेत्यांच्या रोजगारावर गदा येणार आहे. या भाजी विक्रेत्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाईल, असे संजय देशमुख यांनी सांगितले आहे.

Web Title: Uddhav Thackeray in Roha on 6th August