शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:36 IST

Uddhav Thackeray, Raj Thackeray Satyacha Morcha: मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आज मुंबईत मतचोरीविरोधात सत्याचा मोर्चा काढला आहे.  यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आज मुंबईत मतचोरीविरोधात सत्याचा मोर्चा काढला आहे.  यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सक्षम नावाच्या अॅपवरून माझ्या नावाने खोट्या नंबरवरून निवडणूक आयोगाकडे अर्ज केला गेला होता. व्हेरिफिकेशनसाठी हा अर्ज केला होता. माझ्यासह माझ्या कुटुंबाची चारही नावे मतदार यादीतून वगळण्याचा हा डाव असल्याचा मला संशय आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 

राज ठाकरे यांनी पुरावेच दिले आहेत. आपला पक्ष चोरला, नाव चोरले, वडील चोरायचा प्रयत्न केला. आता हेही कमी नाही म्हणून मतदार चोरी करायचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी मतदारयादीतील नावे तपासा. मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, काय तो पर्दाफाश कराच. मुख्यमंत्र्यांनीही मान्य केले, की मतचोरी होतेच आहे, असे ठाकरे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे अधिकारी मातोश्रीवर आले होते. मला विचारतात की, हा नंबर तुमचा आहे का, मी खोटा असल्याचे त्यांना सांगितले. यावर ते तुम्हाला अजून काही सांगायचे आहे का असे त्यांनी विचारले. मी म्हणालो तुम्ही आलात माझ्याकडे, मला काय ते सांगा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

आम्हालाही निवडणुका हव्या आहेत. आम्ही यांना लोकशाहीच्या मार्गाने ठोकण्यासाठी आसुसलेले आहोत. प्रामाणिकपणे आम्ही सर्व मार्ग अवलंबत आहोत. न्यायालयात तरी न्याय मिळतो की नाही याची परीक्षा होणार आहे. मतचोर दिसेल, तिथे त्यांना फटकवा. परत सांगतो, आज ही सगळी एकजूट झालेली आहे. अॅनाकोंडा बसलेला आहे. जशी निवडणूक येईल, तशी दडपशाही सुरू होईल. हे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत. निवडणूक आयोग लाचार झालेला आहे. शिवसेनेची केस सर्वोच्च न्यायालयात सुरुच आहे, तुमच्या मनगटात ताकद आहे. आम्ही तुमच्यासाठी एकत्र आलो आहोत. दोन भाऊ एकत्र आले, आता झाले असे वाटून घेऊ नका. महाराष्ट्राने आवळलेली मूठ असलेला फोटो मतचोरांना पाठवा, असे ठाकरे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray Alleges Election Commission Fraud, False Application in His Name

Web Summary : Uddhav Thackeray accuses Election Commission of fraud, alleging a fake application using his name to remove his family from voter lists. He calls for investigation into voter list discrepancies and vows legal action against alleged voter theft. He urges supporters to unite against oppression.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग