शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray PC: मला का मुख्यमंत्री बनायला लावलं?; उद्धव ठाकरेंचा भाजपाला उद्विग्न सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:53 IST

ठरवलेले घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. पाठीत वार करून शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला हा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण केला जातोय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

मुंबई - राज्याच्या राजकारणात झालेल्या सत्तानाट्यात गुरुवारी शिंदे गट आणि भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजीनाट्यात नवा ट्विस्ट निर्माण झाला. अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिल्याने सर्वांनाच धक्का बसला. या सर्व घडामोडीत उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केले. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याप्रकारे हे सरकार स्थापन झाले, ज्याने सरकार स्थापन केले त्याच्या मते तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. पण मी हेच अडीच वर्षापूर्वी सांगितले होते. माझं आणि अमित शाहांचे ठरले होते. शिवसेना-भाजपाने अडीच अडीच वर्षाचा काळ वाटून घ्यावा. पहिल्या अडीच वर्षात दोघांपैकी एकाचा मुख्यमंत्री झाला असता. मग त्यावेळेला नकार देऊन आता हे का केले हे माझ्यासह राज्यातील जनतेला प्रश्न पडला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. लोकसभा-विधानसभा आपण एकत्र लढवली. लोकसभेपूर्वी जे काही ठरले होते तेच झाले असते. आताची जोडगोळीने अडीच वर्ष पूर्ण केले असते. जे काही आज घडले ते सन्मानाने झाले असते. मग मला मध्ये मुख्यमंत्री कशाला बनायला लावलं? ठरवलेले घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. पाठीत वार करून शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला हा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण केला जातोय. पण हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले

शिवसेना-शिंदे गटात संघर्ष शिवसेनेच्या तब्बल ३९ आमदारांनासोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपाने राज्यात सत्तास्थापन केली. शिंदे गटातील १६ आमदारांविरोधात निलंबनाची नोटीस पाठवली. मात्र शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत उपाध्यक्षांवरच अविश्वास ठराव असल्याने ते नोटीस पाठवू शकत नाहीत अशी बाजू मांडली. या प्रकरणावर ११ जुलैला सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे