शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

उद्धव ठाकरेंसमोरच सुरू झाल्या शरद पवारांच्या नावाने घोषणा, ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 23:10 IST

महाविकास आघाडीच्या बैठकीत साऱ्याच पक्षाचे कार्यकर्ते हजर होते

Uddhav Thackeray Sharad Pawar: विरोधी पक्षातील साऱ्यांची मोट बांधण्याचे काम सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करताना दिसत आहेत. याच धर्तीवर आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेतेमंडळींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच कार्यकर्त्यांना पुढील बाबींसाठी दिशा दिली. यावेळी एक अशी गोष्ट घडली ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

नक्की काय घडलं?

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाषण करत होते. त्यावेळी सभागृहामध्ये एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे जेव्हा बोलायला उठले, तेव्हा NCP च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर “देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो” अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. कार्यकर्त्यांच्या घोषणांनंतर पुढे काय होईल असा उपस्थितांनाही काळी वेळ प्रश्न पडला. पण उद्धव ठाकरेंनी मात्र अतिशय छानपैकी उत्तर दिले आणि मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे म्हणाले- "शरद पवारांना पंतप्रधान बनवण्यासाठी देशाची जनता तयार आहे, आम्हालाही याबद्दल काहीही हरकत नाही. पण त्या आधी मला असे वाटते की तमाम विरोधी पक्षांनी, सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला हवे. आपण तुझं-माझं करत बसू नि इकडेच राहू. घोषणा देणारे पण इकडेच अडकून पडतील. तसं होऊ देऊ नका. पंतप्रधान पद मिळवणं हे फार मोठं स्वप्न आहे. ते एकत्र लढूनच पूर्ण करावं लागेल. कारण आता आपली एकजूट गरजेची आहे. त्यामुळे तळागातील लोकांपासून सुरूवात करा आणि पुढे जात राहा."

महाविकास आघाडीतील विविध पदाधिकारी मंडळींना उद्धव ठाकरेंनी सल्ला दिला. "आम्ही नेतेमंडळी तर भेटत असतो. पण तुम्हालाही गावपातळीवर तिन्ही पक्षाला एकत्र भेटावं लागेल. आपण जर लढणार असू आणि लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर असेल तर पहिली शपथ घ्या… येथे आपल्या पक्षाच्या पदरात काही पडलं नाही तरी चालेल. पण ग्रामपंचायत असो वा एखाद्या सोसायटीची निवडणूक असो भाजपा आणि मिंधे गटाबरोबर युती करायची नाही. ही पहिली तयारी करा," असे ते म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारprime ministerपंतप्रधानNCPराष्ट्रवादी काँग्रेस