शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

Uddhav Thackeray on Navneet Ravi Rana: हनुमान चालिसा वाचायचीय, माझ्या घरी या, पण दादागिरी नाही! उद्धव ठाकरेंची मोठी सभा घेण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 20:48 IST

Uddhav Thackeray on Navneet Ravi Rana: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवनीत रवी राणा यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या आव्हानाचाही समाचार घेतला. तसेच भाजपावरही त्यांनी टीका केली.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यामुळे गेले तीन दिवस राज्यातील वातावरण तापलेले आहे. राणा दाम्पत्याला अटक झाली आहे. यावरून लोकसभेने राज्य सरकारला २४ तासांत राणांसोबत खार पोलीस कोठडीत झालेल्या गैरव्यवहारावर उत्तर मागितले आहे. या साऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे. 

जर कोणाला हनुमान चालिसा वाचायची असेल तर घरी येऊन वाचा, त्याचीही एक पद्धत असते. दादागीरी करून येऊ नका, बाळासाहेबांनी ही दादागिरी कशी मोडायची हे शिकविले आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळा झाला, तेव्हा त्यांनी अराजकीय कार्यक्रमात बोलायचे नाहीय पण गेल्या काही दिवसांपासून जे सुरु आहे, त्यावर बोलावे लागेल असे ते म्हणाले. 

शिवसेनेने हिंदुत्व सोडले, हे सांगितले जाते. ते काय धोतर आहे का?आमचे घंटाधारी नाही तर गदाधारी हिंदुत्व आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी काय  केले? बाबरी पाडली तेव्हा कुठे बसलेले? राम मंदीर बांधण्याचे म्हणताय तर तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे, तुमचा नाही, तुम्ही तर ते बांधण्यासाठी हात पसरले, अशी टीका त्यांनी भाजपावर केली. याचबरोबर त्यांनी नवनीत रवी राणा यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या आव्हानाचाही समाचार घेतला. 

बाळासाहेब म्हणालेले घंटा बडविणारा हिंदू नकोय, तर दहशतवाद्यांना बडविणारा हिंदू हवा आहे. तुम्हाला हनुमान चालिसा घरी वाचायची असेल, तशी संस्कृती तुमच्या घरात नसेल तर माझ्या घरी वाचू शकता, परंतू त्याची एक पद्धत असते. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, साहेबांच्या काळातही येत होते. पण दादागिरी कराल तर ती मोडून काढू, लवकरात लवकर मी एक जाहीर सभा घेणार आहे. मी किंवा अजित पवार मास्क काढत नाही, तोवर तुम्हीही मास्क काढू नका. सक्ती नसली तरी मुक्ती मिळालेली नाही. मला मास्क काढून बोलायचे आहे. एकदाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपाShiv Senaशिवसेना