शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

...तर नामर्दांच्या अवलादींना आम्ही ठेचून काढू, उद्धव ठाकरेंचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 13:03 IST

गुन्हेगारांना पाठीमागे घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल. गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही तर अशा नामर्दाच्या अवलादींना शिवसेना आपल्या पद्धतीने ठेचून काढेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

अहमदनगर - शिवसैनिकांवर पाठीमागून हल्ले करणारे हे नामर्दाची अवलाद आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमने सामने येऊन वार करावा. जर अशा गुन्हेगारांना पाठीमागे घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल. गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तर अशा नामर्दाच्या अवलादींना शिवसेना आपल्या पद्धतीने ठेचून काढेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केडगाव दुहेरी हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांवर पाठीमागून हल्ले करणारे हे नामर्दाची अवलाद आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमने सामने येऊन वार करावा. जर अशा गुन्हेगारांना पाठीमागे घातले जात असेल तर शिवसेनेला कायदा हातात घ्यायचा विचार करावा लागेल. शिवसैनिकांचा हात अजून उठलेला नाही, जर तो उठला तर नामर्दांच्या अवलादीला ठेचून काढू."केडगाव दुहेरी हत्याकांडाचे बळी ठरलेल्या शिवसैनिकांच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. ''या हत्याकांडातील आरोपींना कोणतीही दयामाया दाखवण्यात येऊ नये. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अधिकार वापरावा आणि आरोपींना फासावर चढवावे. आरोपी कोणत्याही पक्षाचे असला तरी त्यांना शासन झालेच पाहिजे,  छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून तुम्ही राज्यकारभार चालवणार असाल तर गुन्हेगारांना शिक्षा करा, अन्यथा महाराजांचे नाव घेऊ नका,'' असे उद्धव ठाकरे म्हणाले.   शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांबाबत मुख्यमंत्र्यांकडून स्वीकारण्यात आलेल्या पावित्र्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला, "राज्यात मुख्यमंत्रीच सहकारी मंत्र्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील तर हे सरकार निकम्मे आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट आहे. त्यामुळे राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असला पाहिजे, अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे." ''या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी कृष्णप्रकाश यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना इथे आणले पाहिजे. तसेच या प्रकरणी सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांना मी स्वत: फोन करणार आहे, त्यांच्याकडे ही केस सोपवली गेली पाहिजे.'' अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. लोकांवर दबाव टाकला जात आहे, असंच जर होत असेल तर आम्हाला इथे येऊन ठाण मांडावे लागेल आणि ही गुंडागर्दी मोडून काढावी लागेल.  शिवसेनेला कायदा हातात घेऊन प्रतिकार करण्याची वेळ आली तर तो करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडAhmednagarअहमदनगर