शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

'निवडणूक आयोगाला 3 चिन्हे आणि 3 नावांचा पर्याय दिलाय; आयोगाने लवकर निर्णय घ्यावा'- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 18:38 IST

''शिवसेना आणि तुमचा काहीही संबंध नाही. पक्षाचे नाव नाव माझ्या आजोबांनी दिले, वडीलांनी रुजवले, त्याचा तुम्ही घात करताय. "

मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने काल मोठा निर्णय दिला. ठाकरे आणि शिंदे गटाला धक्का देत, आयोगाने चिन्ह गोठवले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला लवकरात लवकर पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याची विनंती केली. तसेच, शिंदे गट आणि भाजपवरही हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हाले की, ''कालचा निवडणूक आयोगाने दिलेला निकाल अपेक्षित नव्हता. आम्ही निवडणूक आयोगाला कालच पत्र पाठवून तीन चिन्हे आणि नावे दिली आहेत. लवकरच अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आम्हाला चिन्ह आणि नावाची गरज आहे. माझी आयोगाला विनंती आहे की, त्यांनी लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा." 

स्वतः शिवसेनाप्रमुख व्हायला निघालेतशिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणतात की, "शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको म्हणून काही जणांनी आपल्याशी गद्दारी केली. ज्यांना मुख्यमंत्रीपद हवे होते, त्यांनी ते मिळवले. इतके दिवस आम्ही सहन केले, पण आता अती होत आहे. शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको, इथपर्यंत ठीक होते. पण, आता शिवसेना प्रमुख पद घेण्याचा प्रयत्न सुरू आहे," असा आरोप त्यांनी यावेळी केला. 

यांचा उपयोग संपल्यावर...ते पुढे म्हणतात, ''शिवसेना आणि तुमचा काहीही संबंध नाही. पक्षाचे नाव नाव माझ्या आजोबांनी दिले, वडीलांनी रुजवले, त्याचा तुम्ही घात करताय. आज अनेकांचा फोन येतोय, अनेकजण रडत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, संकट येत असतात, संकटातही संधी असते, तीच संधी मी शोधतोय. भारतीय जनता पक्ष त्यांचा उपयोग करुन घेताहेत. यांचा उपयोग संपल्यानंतर यांनाही फेकून देतील,'' अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा