शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

'शिवसेना तुमची आई होती, त्याच आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली', उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 18:51 IST

'हिंमत असेल तर, बाळासाहेबांच्या नावाशिवाय निवडणूक लढवून दाखवा.'

मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने काल मोठा निर्णय दिला. ठाकरे आणि शिंदे गटाला धक्का देत, आयोगाने चिन्ह गोठवले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

आईच्या काळजात कट्यार घुसवलीउद्धव ठाकरे म्हणाले, ''काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला. ज्या धनुष्यबाणाची शिवसेनाप्रमुख पूजा करत होते, आजही पूजा होते, ते चिन्ह या 40 लोकांमुळे गोठले. तुम्ही भगवान रामाचे धनुष्यबाण गोठवले. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला, जी शिवसेना तुमची आई होती, त्याच आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली.''

'निवडणूक आयोगाला 3 चिन्हे आणि 3 नावांचा पर्याय दिलाय; आयोगाने लवकर निर्णय घ्यावा'- उद्धव ठाकरे

निष्ठा विकत घेता येत नाहीते पुढे म्हणाले, ''त्यांना आता आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. त्यांच्या मागे असलेली महाशक्ती खूप खुश असेल. ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, हिंदू अस्मिता जपली, त्याच शिवसेनेचे नाव तुम्ही गोठवले. चिन्ह गोठवले, पण निष्ठा विकत घेता येत नाही. आता शिवसैनिकांना दमदाट्या सुरू आहेत. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी शिवसेनेवर बंदी घातली नव्हती. त्यांनी जे केले नव्हते, ते तुम्ही करत आहात.''

हिंमत असेल तर...''माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी आत्मविश्वासाने जगायचे शिकवले. शिवसैनिक माझ्या पाठिशी आहेत. माझे तुम्हाला आव्हान आहे. बाळासाहेबांचे नाव न घेता निवडणूक लढवा. तुम्हाला बाळासाहेब हवे, पण त्यांचा मुलगा नको. ही शिवसेना कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी तयार आहे. आमचे चिन्ह गोठवले, हा अन्याय आहे. मला हा निकाल अपेक्षित नव्हता, पण माझा न्यायालयावर विश्वास आहे, न्याय नक्की मिळेल,'' असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा