शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

Uddhav Thackeray: सावरकरांचा अपमान, मालेगावमध्ये उद्धव ठाकरे कडाडले, राहुल गांधींना सुनावले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 21:08 IST

Uddhav Thackeray: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज मालेगावमध्ये झालेल्या सभेतून घणाघाती टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आणि मोदी शाहांविरोधात कमालीचे आक्रमक झालेले आहेत. यादरम्यान, राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनाही लक्ष्य करून त्यांच्याबाबत वादग्रस्त विधानं करत आहेत. मात्र राहुल गांधींच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज मालेगावमध्ये झालेल्या सभेतून घणाघाती टीका केली आहे. राहुल गांधींना मी जाहीरपणे सांगतो की, सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान आम्हाला अजिबात पटणार नाही. आपण जरुर एकत्र आलोय ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. त्याच्यामध्ये आता कुठे फाटे फुटू देऊ नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

सावरकरांच्या अपमाना्च्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, राहुल गांधींना आम्हाला एक सांगायचं आहे. तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत गेलात. आम्ही तुमच्यासोबत होतो. संजय राऊत भारत जोडो यात्रेमध्ये तुमच्यासोबत सहभागी झाले होते. ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे.  कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणे सांगतो की, सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही. अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे बजावले.

ते पुढे म्हणाले की, सावरकर काय होते हे केवळ आपण वाचू शकतो. पण सावरकरांनी काय केलं होतं. तेव्हाचा तो सगळा काळ जर डोळ्यांसमोर आणला, तर दिसेल की, चाफेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर १५ वर्षांचा मुलगा घरातल्या अष्टभूजा देवीसमोर शपथ घेतो, की देशासाठी देशाच्या शत्रूला चाफेकर बंधूंसारखा मारत मारत मरेन किंवा शिवछत्रपतींसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन.

सावरकरांचे वडील हे टिळक भक्त. सावरकरांनी जे काही केलं आहे ते येऱ्यागबाळ्याचे काम नाही.१४ वर्षे रोज मरण यातना भोगल्या. छळ सोसला. हे सुद्धा एकप्रकारे बलिदानच आहे. जसे क्रांतिकारक फाशी गेले. गोळ्या खावून बलिदान दिलं. तसंच १४ वर्षे मरणयातना सोसणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. म्हणून राहुल गांधींना सांगतो की, आपण जरुर एकत्र आलोय ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. या देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्याच्यामध्ये आता कुठे फाटे फुटू देऊ नका. तु्म्हाला डिवचलं जातंय. मात्र आता जर का वेळ चुकली तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, अशी चिंताही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर