शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी उद्धव ठाकरे अडचणीत; समिती करणार आरोपांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 08:18 IST

उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा, एमएमआरमधील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार

मुंबई - एमएमआरमधील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आजच देण्यात येतील. जे निकषात बसत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत स्पष्ट केले. घाटकोपर येथे १३ मे रोजी  जाहिरात होर्डिंग कोसळून १७ जणांचा दुर्दैवी म़त्यू झाला होता. या प्रकरणाची निवृत्त न्या. भोसले यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे. विधानसभेत उद्धव ठाकरेंवर झालेल्या आरोपांचीही चौकशी समिती करेल, असे ते म्हणाले. 

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. या प्रकरणी केवळ कैसर खालिद या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करून चालणार नाही तर दोषी असणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई झाली पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.  भाजपचे राम कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली.

भावेश भिंडेसोबतच्या फोटोवरून पुन्हा जुंपली

होर्डिंगबाबतचे धोरण तयार असून, आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच ते हरकती आणि सूचनांसाठी खुले करण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. या होर्डिंग प्रकरणातील दोषी भावेश भिंडेंचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत फोटो कसा काय? असा सवाल करत भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरेंची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. कोरोना काळातच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’च्या नावाखाली होर्डिंगवाल्यांसोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले असून, यामागच्या कटकारस्थानाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी झाली.  हे सर्व मुद्दे निवृत्त न्यायाधीशांच्या चौकशी समितीकडे दिले जातील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

नितेश राणे - सुनील राऊत आमने-सामने यावेळी भाजप आमदार नितेश राणे आणि उद्धवसेनेचे आ. सुनील राऊत यांच्यात शाब्दीक चकमक झाली. होर्डिंगच्या कंपनीचा मालक भावेश भिंडे हा सुनील राऊत यांचा पार्टनर होता, असे राणे म्हणाले. कोरोना काळात ‘मातोश्री’वर आमदारांना प्रवेश नव्हता, मग या भिंडेला तिथे घेऊन जाणारा आमदार कोण? याची चौकशी झाली पाहिजे, असे राणे म्हणाले. त्यावर भिंडेसोबतचा व्यवहार सिद्ध झाला तर मी इथेच राजीनामा देईन, असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेUday Samantउदय सामंतvidhan sabhaविधानसभा