शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'मी अयोध्येला शिवनेरीची माती घेऊन गेलो अणि त्यानंतर मुख्यमंत्रीही झालो'- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 18:44 IST

'आपण सगळे एकच आहोत. आम्ही राम-राम म्हणतो अन् तुम्ही श्रीराम म्हणता.'

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत उत्तर भारतीयांसोबत बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी उत्तर भारतीयांच्या पाठिंब्यासाठी आवाहन केले.  'मी आज तुमची साथ मागायला आलो आहे. तुम्ही अनेक पिढ्यांपासून इथे राहता. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. मी आपलं नातं मजबूत करण्यासाठी आलो आहे. आपण एकमेकांना हिंदू मानत असू, तर उत्तर भारतीय आणि मराठी वेगळे व्हायला नको,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, 'हे कोणतं हिंदूत्व आहे...काय आहे आपलं स्वप्न...मी तुम्हाला भडवण्यासाठी आलो नाही. मी तुमचे डोळे उघडण्यासाठी आलो आहे. हेच आपले हिंदूत्व आहे का..?ज्या मार्गाने हे आपल्याला घेऊन जात आहेत, त्या मार्गाने देशाची बदनामी होईल. पूर्वी हिंदू आहे बोलायला भीती वाटायची, भविष्यात लाज वाटेल. राम मंदिराचे प्रकरण शांत झाले होते, आम्हीच ही मागणी लावून धरली. मी अयोध्येला गेले होतो, तिथे जाण्यापूर्वी शिवनेरीची माती घेऊन गेले होतो. त्यानंतर राम मंदिराचा निर्णय झाला आणि मीही मुख्यमंत्री झालो. आपण एकच आहोत, आम्ही राम-राम म्हणतो अन् तुम्ही श्रीराम म्हणता.' 

'यांचे हिंदूत्व झोपले होते, तेव्हा माझ्या वडिलांनी यांना उठवलं आणि आता गरज सरल्यावर आम्हाला सोडून दिलं. माझे वडील म्हणायचे, राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदूत्व आहे. मनात राम आणि हाताला काम पाहिजे. कुणावर अन्याय करू नका आणि अन्याय सहन करू नका, असे आमचे हिंदूत्व आहे. आज अनेक उत्तर भारतीय एकत्र येत आहेत. आता मुस्लिमही आमच्यासोबत येत आहेत. आपल्याला आपल्या स्वप्नातला देश उभा करायचा आहे. आपला भारत स्वातंत्र आहे, पण हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. भाजपकडे हिम्मत नाही आणि स्वतःला हिंदूंचा नेता म्हणतात. मी आजही त्यांना आव्हान देतो, निवडणुका घ्या, आम्ही तयार आहोत,' असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिरBJPभाजपाShiv Senaशिवसेना