शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या चरणी जीवन समर्पित केलंय; भाजपाचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 14:59 IST

ही लोकशाही सामान्य व्यक्तीच्या आयुष्यातील अंधार दूर करावा यासाठी आहे. एका माणसाने मुख्यमंत्री व्हावं आणि साडे बारा कोटी जनतेनं दुख सहन करावं यासाठी लोकशाही आहे का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

मुंबई - काहीजण गुंडगिरीची भाषा करून अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करतायेत. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात कुठलाही हल्ला होणार नाही याची काळजी घ्यावी. सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी ही शासकीय संस्थांची आहे. गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यातील जनता माफ करणार नाही असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. विधिमंडळ अधिवेशनापार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांनी विधानसभा उपाध्यक्ष आणि विधिमंडळ सचिवांनी भेट घेतली. आजारी आमदारांसाठी वेगळी व्यवस्था करण्याची मागणी केली. त्याचसोबत आमदारांच्या सुरक्षेबाबतही चर्चा केली. उद्याच्या विश्वासदर्शक ठरावाचा आढावा घेतला. 

यानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अल्पमतातील सरकार लोकशाहीत जबरदस्ती का करतेय? तुमचे आमदार टिकले नाही आणि भाजपावर, राजभवनावर टीका करायची. सुपीक डोक्यातील नापीक कल्पनेला जनता भीक घालणार नाही. गेल्या अडीच वर्ष सरकारने जनतेसोबत बेईमानी केली. दारूवरील कर हटवले. गुंडगिरीचा प्रयत्न जनता खपवून घेणार नाही. सरकारने बहुमत गमावले आहे. शिवसेना आमदार गुवाहाटीतून काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा असं वारंवार म्हणत आहेत. परंतु हे जनतेने निवडून दिलेल्या आमदारांची साथ सोडण्यास तयार आहेत परंतु शरद पवारांची साथ सोडत नाही. धमक्या येत असल्याने सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला संरक्षण देण्याचे आदेश दिलेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुख्यमंत्री होता यावा, फक्त खुर्ची तोडण्यासाठी, एखाद्याने मुकुट घालण्यासाठी लोकशाही नव्हे. ही लोकशाही सामान्य व्यक्तीच्या आयुष्यातील अंधार दूर करावा यासाठी आहे. एका माणसाने मुख्यमंत्री व्हावं आणि साडे बारा कोटी जनतेनं दु:ख सहन करावं यासाठी लोकशाही आहे का? सरकारला बहुमत की अल्पमत ही परीक्षा द्यायची आहे आम्ही वेट अँन्ड वॉच ठेवला आहे. तर एका तासातही दाखवू शकता. स्वत:चे आमदार, जनतेचे न ऐकता पवारांना जीवन अर्पण केलंय. खुर्चीसाठी जनतेशी गद्दारी केली. अवमान केला त्याचे हे फळ आहे असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार