शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं, पण..."; शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 13:04 IST

महाराष्ट्राचे रामराज्य करायचे असेल तर अयोध्येतील श्रीराम मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतलेच पाहिजेत असं केसरकर म्हणाले.

मुंबई - आता यापुढे जे काही करायचे ते उद्धव ठाकरेंनाच करायचे आहे. आम्ही आमचा प्रयत्न केला. स्वत: मोदींनी सांगूनही ते आलेले नाहीत. मोदींना दिलेले वचनही त्यांनी मोडले. मी त्याचा साक्षीदार आहे. मोठ्या भावाने लहान भावाला माफ करावे लागते. परंतु ज्याप्रकारे अपमान झालाय ते पाहता जुळवून घेणे उद्धव ठाकरेंच्या हातात आहे असं विधान शिवसेना नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. 

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आम्हाला जे काही प्रयत्न करायचे होते ते आम्ही केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायचे हे उद्धव ठाकरेंनीच ठरवले होते. पण शरद पवारांनी माझ्यावर दबाव आणला आणि मला मुख्यमंत्री व्हायला लागले असं ठाकरेंचे म्हणणं होते. नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असले असते. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातीलच मुख्यमंत्री राज्यात आहेत. त्यामुळे त्यांना फारसं वाईट वाटू नये असं मला वाटते. 

तसेच राज्यात काम करताना श्रीरामाचे आशीर्वाद मिळाले पाहिजेत. राज्य किती चांगले असावे तर त्याला रामराज्य म्हटलं जाते. महाराष्ट्राचे रामराज्य करायचे असेल तर अयोध्येतील श्रीराम मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतलेच पाहिजेत. आम्ही उत्तर प्रदेश भवन मुंबईत बांधले तसे रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी जे मराठी बांधव तिथे जातील त्यांच्यासाठी अयोध्येत मराठी भवन असावं. त्यासाठी दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट होणार आहे. त्यातून सकारात्मक घडेल असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौराधनुष्यबाण आणि शिवसेना नावाबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह समर्थक आमदार अयोध्येला जाणार होते असं सांगण्यात आले. हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटातील आमदार आणि समर्थक आमदार ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, सर्व कार्यक्रम ठरल्याचे सांगितले जात आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये हा धनुष्य जनतेपर्यंत फिरवला जाईल, अशी योजना शिंदेंच्या शिवसेनेने आखली आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDeepak Kesarkarदीपक केसरकर