शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाचा विदर्भावर ‘फाेकस’; विधानसभची चाचपणी करण्यासाठी खास माणूस पाठविला

By आशीष गावंडे | Updated: June 19, 2024 20:39 IST

संपर्क प्रमुख तथा खा.अरविंद सावंत घेणार आढावा

अकोला: निवडणुकीच्या निकालाअंती जनतेचा काैल शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट)व काॅंग्रेसच्या पारड्यात असल्याचे समाेर आले. शिवसेनेला पक्ष फुटीचे ग्रहण लागल्यानंतरही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाचे नऊ उमेदवार विजयी झाले. यामुळे ठाकरे यांनी आगामी हाेऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीसाठी विदर्भावर ‘फाेकस’केला असून २० जून राेजी विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत अकाेला जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी दाखल हाेत आहेत.

लाेकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करीत ४८ पैकी ३० जागांवर विजयश्री प्राप्त केला. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही नंतर काॅंग्रेसला पाठिंबा दिल्याने ही संख्या ३१ झाली आहे. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना (शिंदे)व राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट)यांनी स्थापन केलेल्या महायुतीच्या वाटेला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला असून आगामी ऑक्टाेबर महिन्यांत हाेऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी तीनही पक्षांनी चाचपणीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाला सुरुवातीपासूनच मुंबइ, काेकण पाठाेपाठ विदर्भाची साथ मिळाली आहे. त्यामुळे की काय, ठाकरे गटाने विदर्भावर लक्ष्य केंद्रित केले असून पक्षाचा जिल्हानिहाय तसेच विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेण्याची जबाबदारी विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांच्यावर साेपवली आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम विदर्भाचा आढावासेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत २० जून राेजी बुलढाणा जिल्ह्यात दाखल हाेणार आहेत. पहिल्या टप्प्यात पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकाेला, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील पक्ष बांधणीचा आढावा घेतील. बुलढाणा येथून सायंकाळी अकाेला शहरात येऊन बैठकीत विधानसभा मतदारसंघ निहाय चर्चा करतील. शिवसैनिकांसाेबत संवादआगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आयाेजित बैठकीत शिवसैनिकांसाेबत संवाद साधल्या जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता गाेरक्षण राेडस्थित मंगलकार्यालयात आढावा बैठकीच्या नियाेजनासाठी आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर व त्यांची चमू कामाला लागली आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Sawantअरविंद सावंत