शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनापूर्वी उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का?; शिंदे गटाच्या खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:41 IST

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच काँग्रेसचे ४ माजी आमदारही बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतील असं खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटलं आहे.

नागपूर - राज्याचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना अधिवेशनापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे. त्याबाबत विदर्भातील शिंदे समर्थक खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे. विदर्भात युवासेनेचे अनेक पदाधिकारी आज शिंदे गटात सहभागी झाले. २ महिन्यापासून या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात समावेश होणार होता. पुढील काळात ८ जिल्हाप्रमुख शिंदे गटात सहभागी होतील असा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. 

खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, हिवाळी अधिवेशन काळात हे पक्षप्रवेश पार पडतील. हे सर्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहे. महाराष्ट्राचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आहे. ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनाही शिंदेसोबत यायचं आहे. बाळासाहेबांची खरी शिवसेना आमचीच आहे असा विश्वास शिवसैनिकांना वाटतो. डिसेंबर महिन्यात मोठा पक्षप्रवेश सोहळा नागपूरात होणार आहे. जिल्हाप्रमुखासोबत कार्यकर्त्यांची फळीदेखील शिंदे गटात येतील असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत काँग्रेसचे ४ माजी आमदारही बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतील. सर्वकाही ठरलं होते. भविष्यात काही खासदार शिंदे गटात येतील. हिवाळी अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरात येतील तेव्हा हा पक्षप्रवेश सोहळा होईल. आज पूर्व विदर्भातील युवासेनेचे ६ जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले असंही खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटलं. 

विदर्भात ठाकरेंची ताकद कमी करणार?राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना कमकुवत झाली. परंतु आदित्य ठाकरे राज्यभरात दौरे करून संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेही मातोश्री येथून दररोज विविध विभागातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत शिंदे समर्थक ४० आमदारांच्या मतदारसंघात नवं नेतृत्व उभं करण्याच्या दृष्टीने रणनीती आखत आहेत. मात्र आजही शिंदे-ठाकरे गटामध्ये चढाओढ सुरू आहे. त्यात हिवाळी अधिवेशनात विदर्भात ठाकरेंची ताकद कमी करण्याची खेळी शिंदे गटाकडून आखली जात आहे. त्यामुळे विदर्भात येत्या काळात मोठी फूट पडल्याचं चित्र निर्माण होणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाKrupal Tumaneकृपाल तुमानेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे