शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

CoronaVirus: ...म्हणून ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी, भाजप खासदाराकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 23:02 IST

राज्यात २४ तासांत ८०२  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. (Uddhav Thackeray)

मुंबई- संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. दोशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सातत्याने निशाणा साधताना दिसत आहेत. मात्र, आता भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना काळातील कामाचे कौतुक केले आहे. (Uddhav Thackeray govt needs a small pat in on the back for lowering the Coronavirus infection rate in Mumbai says Subramanian Swamy)

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ठाकरे यांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. मुंबईत कोरोना व्हायरस संक्रमणाचा दर कमी केल्याबद्दल उद्धव ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी. तसेच, मला विश्वास आहे, की आता रुग्णालयेही सज्ज झाली आहेत, असेही स्वामी यांनी म्हटले आहे. 

धक्कादायक!: अदर पुनावालांना 'पॉवरफूल' लोकांच्या धमक्या, म्हणाले - फोन कॉल्स सर्वात वाईट गोष्ट!

राज्यातील ठाकरे सरकारने कोरोना रूग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी १५ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला ऑक्सिजनपासून ते अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात ८०२ मृत्यूची नोंद - राज्यात शनिवारी ६३ हजार २८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर दिवसभरात ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात २४ तासांत ६१ हजार ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ३९ लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४.२४ टक्के एवढे झालं आहे.

CoronaVirus Live Updates : संभाव्य तिसरा लाटेसाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व महापालिका आयुक्तांना आदेश

राज्यात २४ तासांत ८०२  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ६ लाख ६३ हजार ७५८ इतकी आहे.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई