धक्कादायक!: अदर पुनावालांना 'पॉवरफूल' लोकांच्या धमक्या, म्हणाले - फोन कॉल्स सर्वात वाईट गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 08:52 PM2021-05-01T20:52:38+5:302021-05-01T20:53:05+5:30

केंद्र सरकारने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदर पूनावाला यांना संपूर्ण देशात ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. (Adar poonawala)

CoronaVirus vaccine Adar poonawala is getting threats from powerful people says phone calls are the bad thing  | धक्कादायक!: अदर पुनावालांना 'पॉवरफूल' लोकांच्या धमक्या, म्हणाले - फोन कॉल्स सर्वात वाईट गोष्ट!

धक्कादायक!: अदर पुनावालांना 'पॉवरफूल' लोकांच्या धमक्या, म्हणाले - फोन कॉल्स सर्वात वाईट गोष्ट!

googlenewsNext

नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा अदर पुनावालां यांचे म्हणणे आहे, की फोन कॉल्स ही सर्वात वाईट गोष्ट आहे. तसेच, कोरोना लशीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर फोन कॉल्स येत आहेत आणि धमक्याही मिळत आहेत, असेही अदर पुनावाला यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर सत्य बोलल्यास माझे शीर कापले जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. ते द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (CoronaVirus vaccine Adar poonawala is getting threats from powerful people says phone calls are the bad thing )

अदर म्हणाले, 'कॉल करणारांमध्ये भारतीय राज्यांतील मुख्यमंत्री, व्यापार मंडळांचे प्रमुख आणि अनेक प्रभावशाली मंडळींचा समावेश आहे. हे लोक फोनवरून कोविशिल्ड लशीचा तत्काळ पुरवठा करा, अशी मागणी करत आहेत. अदर म्हणाले, कोविशील्ड लस मिळविण्याची आशा आणि आक्रामकतेची पातळी अभूतपूर्व आहे. सध्या, कोरोना महामारी पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत देशात पसरत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर भय आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सातत्याने मृत्यूही होत आहेत.

खूशखबर! रशियन कोरोना लस Sputnik-Vची पहिली खेप भारतात दाखल; जाणून घ्या, किती आहे प्रभावी

पुनावाला यांना केंद्राकडून Y सुरक्षा -
केंद्र सरकारने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदर पूनावाला यांना संपूर्ण देशात ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. SII मध्ये Director of Government and Regulatory Affairs प्रकाश कुमार सिंह यांनी 16 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून पूनावाला यांना संरक्षण देण्याची विनंती केली होती, यानंतर केंद्राने त्यांना संरक्षण दिले.

Shocking News!: रुग्णवाहिकेनं फक्त 4Km साठी घेतले तब्बल 10,000 रुपये, IPSनं शेअर केली पावती!

खरे की खोटे देशाला कळायला हवे – आव्हाड
सिरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेलेत, अशी बातमी आहे. द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, की मला धमक्या मिळत आहेत आणि सत्य बोललो तर शीर कापले जाईल. NDTV चे पत्रकार रविष कुमार यांनी सुध्दा या संदर्भात पोस्ट केली आहे. देशाला हे कळायला हवे, की हे खरे आहे की खोटे.

रशियन कोरोना लस Sputnik-V भारतात -
कोरोना संकट आणि अनेक गोष्टींबरोबरच लशीच्या तुटवड्याचाही सामना करत असलेल्या भारतासाठी आनंदाची बातमी आहे. रशियन लस स्पुतनिक-V ची पहिली खेप शनिवारी हैदराबादेत दाखल झाली. ही लस कोरोना व्हायरस विरोधत 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे बोलले जाते. लसीकरण कार्यक्रमाची गती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच स्पुतनिक -V ला इमेरजन्सी वापराची परवानगी दिली होती.

Web Title: CoronaVirus vaccine Adar poonawala is getting threats from powerful people says phone calls are the bad thing 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.