शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Uddhav Thackeray in Nagpur: पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे समोरामोर येणार? नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 08:22 IST

Winter session Maharashtra: राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे विधानसभा कामकाजात भाग घेणार असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे अद्याप विधान परिषदेचे सदस्य आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून पायऊतार करायला भाग पाडणारे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाच महिन्यांनी भेट होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले असून रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये उतरलेले आहेत. त्यांनी सोमवारी रात्री ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक घेत विधानसभेतील रणनीती आखली आहे. 

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे विधानसभा कामकाजात भाग घेणार असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे अद्याप विधान परिषदेचे सदस्य आहेत. शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याची घोषणा केलेली. परंतू, विधान परिषदेतील संख्याबळ आणि गणित पाहत त्यांनी हा राजीनामा खिशातच ठेवला होता. 

उद्धव ठाकरेंनी गेल्या वेळचे पावसाळी अधिवेशन मुंबईत असतानाही हजेरी लावली नव्हती. परंतू, आता विरोधी पक्षांची एकजूट केल्याने ठाकरेंना नागपुरात येणे रणनीतीच्या दृष्टीने भाग आहे. शिंदे सरकारविरोधात रणनिती बनविण्यात राष्ट्रवादी, काँग्रेसपेक्षा ठाकरे गट सक्रीय आहे. त्यांच्याकडे तसे कारणही आहे. यामुळे ठाकरेंनी सोमवारी रात्री आमदारांची बैठक घेतली आहे. ही बैठक सायंकाळी ६ वाजता सुरु झाली होती. या बैठकीनंतर ठाकरेंनी महाविकास आघाडीची आज सकाळी ९ वाजता एक महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीचे आयोजन विधानसभेतच करण्यात आले आहे. यासाठी ठाकरेंना विधानसभेत यावे लागणार आहे. 

शिवसेनेचे कार्यालयही बदलले...हिवाळी अधिवेशनादरम्यान दरवेळी शिवसेनेचे कार्यालय भाजप कार्यालयाच्या बाजूला अर्थात विधानसभेच्या पायऱ्यांपुढे असते. मात्र, शिवसेनेच्या शिंदे गटाला हे कार्यालय मिळाले. कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फोटो काढून त्या ठिकाणी आनंद दिघे यांचा फोटो लावण्याची तयारी सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या दोन्ही बाजूला पुष्पमाला घालण्यासाठी खिळे ठोकण्यात आले.  याचवेळी विधिमंडळाच्या सभागृहाच्या दक्षिण द्वाराजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाजूला शिवसेनेच्या ठाकरे गटाला जागा देण्यात आली.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना