शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi Security Breach: 'सुरक्षेतील त्रुटींमुळे देशानं दोन पंतप्रधान गमावले आहेत, म्हणून...'; उद्धव ठाकरे पंजाब घटनेवर काय म्हणाले संजय राऊतांनी सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 21:49 IST

PM Modi Security Breach: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटं अडकून पडले होते. यावरुन आता जोरदार राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे.

PM Modi Security Breach: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटं अडकून पडले होते. यावरुन आता जोरदार राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे. भाजपानं पंजाब काँग्रेसवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काँग्रेसनंही मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन वेगवेगळे आरोप केले आहेत. यातच आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. 

संजय राऊत यांनी पंजाब घटनेबाबत नुकतंच एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केली आहे. "पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता  कामा नये. पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. 

सोनिया गांधींनीही केली चौकशीची मागणीकाँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्याशी संपर्क साधला. यात त्यांनी, या संपूर्ण घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत काँग्रेस हायकमांडने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी सीएम चन्नींना, पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात संपूर्ण काळजी घ्यायला हवी, असे सांगितले. तसेच झालेल्या घटनेस जे कुणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही म्हटले आहे.

नाना पटोले म्हणाले मोदी नौंटकी करुन देश चालवतातपंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेली चूक आणि त्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे. पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याचा हात तर नाही ना? असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. 

"पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा १५ दिवसांपूर्वीपासूनच सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं नियंत्रण करत असते. एसपीजी गृहखात्याअंतर्गत येते. अमित शहा त्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शहांचाच तर हात नाही ना असा प्रश्न निर्माण होतो. देशाच्या गृहमंत्र्यांनीच खरंतर याबाबत उत्तर द्यायला पाहिजे", असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब