शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

Uddhav Thackeray: 'राज्यात सध्या बाप पळवणारी टोळी फिरतीये', उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 20:29 IST

'मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची औलाद फिरत आहे, आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही.'

मुंबई: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढला आहे. यातच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभेतून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. सध्या राज्यात बाप पळवणारी टोळी फिरतीय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, संजय राऊत एकटे लढत आहेत, मोडेन पण वाकणार नाही, असा आमचा संजय आहे, अशा शब्दात त्यांनी राऊतांचे कौतुक केले.

संबंधित बातमी- “अमित शाह म्हणतात शिवसेनेला जमीन दाखूव, आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू”; उद्धव ठाकरेंचा घणाघात

'मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची...'मुंबईच्या पालिका निवडणुकीवरुनही उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. 'मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची औलाद फिरू लागली आहे. हे काही नवीन नाहीये, आम्ही शिवरायांचा इतिहास वाचलाय. त्यावेळेसही आदिल शहा, निझाम शहा, हा शहा, तो शहा चालून आले. आताही अमित शहा येऊन गेले. देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहिती नाही, इथल्या जमिनीत गवताची पाती नाहीत, तलवारीची पाती आहेत. तुम्हाला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही,' अशा शब्दात त्यांनी शहांवर टीका केली.

संबंधित बातमी-  'मुंबई आणि कमळाबाईचा काय संबंध? ही आमची मातृभूमी', उद्धव ठाकरे कडाडले

'युतीत 25 वर्षे सडली''दुर्दैवाने आपण त्यांच्यासोबत युती केली. मी पुन्हा बोलतोय, 25 वर्षे युतीमध्ये सडली. ही सगळी नालायक माणसे जोपासली. मेहनत आम्ही घ्यायची आणि फुकत त्यांना द्यायच. आमच्या जिवावर वरती पोचलात आणि आम्हाला लाथा मारताय. ही लोक आमच्या वंशावर आमच्या घराण्यावर टीका करत आहेत. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. वंशावर टीका करणार असाल, तर तुमचा वंश कोणता, त्यावर आधी बोला,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा