शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

'दोघेजण फक्त चकरा मारताहेत, पाळणा काही हलेना'; उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 20:02 IST

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.

मुंबई:एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांच्या सरकारची स्थापना होऊन महिना उलटून गेला, पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरुन विरोधक सातत्याने सरकारवर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरुन आता माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका केली आहे.

संबंधित बातमी- 'शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर...', उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

'पाळणा हलत नाहीये...'आज मातोश्री येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकी दरम्यान बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'अनेक दिवसांपासून दोन जण दिल्लीला चकरा मारत आहेत, पण पाळणा काही केल्या हलत नाहीये. आता बातमी आली की, उद्या विस्तार होणार, पण विस्तार झाल्यावर काय दिवे लावणार. जाउद्या, त्यांचं त्यांना लखलाभ. आता मी मैदानात उतरलोय. निष्ठा आणि पैसा अशी ही लढाई सुरू झाली आहे,' असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

'त्यांना युज अँड थ्रो केलं जातंय'ठाकरे पुढे म्हणाले की, 'गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही सगळे जोडले जात आहात. महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते अन् गद्दाराला गाडते. भगव्याच्या पाठीत खंजीर खुपसलाय, त्या गद्दारांचे नामोनिशाण शिल्लक राहिल नाही. मात्र, भगवा तसाच फडकत आहे. गद्दारांच्या मतदारसंघात कमळ फुलवण्याची भाषा केली जात आहे. त्यांच्या लक्षात येईल कसं 'युज अँड थ्रो' केलं जातंय,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस