शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

''भाजपाची पालखी कायम वाहणार नाही; हाही शब्द बाळासाहेबांना दिला होता''

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 12:19 IST

हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.

नागपूरः हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीसांनी काल 'सामना'च्या आडून शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?', असा प्रश्न काल फडणवीसांनी विधानसभेत विचारला होता, त्याला उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दिलेल्या शब्दाचं कौतुक फडणवीस तुम्हाला कधीपासून झालं?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, मी त्या थराला गेलो आणि करून दाखवलं. भाजपाची पालखी कायम वाहणार नाही, हाही शब्द बाळासाहेबांना दिला होता, याचीसुद्धा आठवण उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना करून दिली आहे. 

आम्ही दिलेलं वचन पाळतो, यापुढेही पाळणार आहोत. बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. सुरू असलेले संसार भाजपाने मोडले, लालू आणि नितीश यांची युती तुम्हीच तोडलीत. राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. तर देशाची आर्थिक स्थिती कोमामध्ये आहे. मेक इन इंडियात किती करार झाले? गुंतवणूक आली पण पुढे काय झालं?, इतर देशातील हिंदू घ्या, पण त्यांना ठेवणार कुठे, निर्वासितांची काळजी वाहणार कोण?, असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. सीमाभागातील मराठी बांधव इतके आक्रोश करत आहेत, तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या तीन चाकी रिक्षा सरकार असल्याच्या टीकेवर गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तर तीन चाकी रिक्षाच परवडते असं सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कोणत्याही कामाला स्थगिती देण्यात आली नसल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपाने सभागृहात आज देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांना  25,000 रुपये हेक्टरी मदत जाहिर करण्याची मागणी केली होती. सभागृहात काही वेळ चाललेल्या आरोप- प्रत्यारोपनंतर भाजपाने सभात्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.