शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंपुढे मोठा पेच, सत्तेतून बाहेर पडायचे की मंत्री बदलायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 20:28 IST

शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना घरी बसवून नव्यांना संधी द्यायची की सत्तेतूनच बाहेर पडायचे असा पेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पडला

मुंबई - शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना घरी बसवून नव्यांना संधी द्यायची की सत्तेतूनच बाहेर पडायचे असा पेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पडला असून ३० सप्टेंबरच्या दसरा मेळाव्यात ते काय भूमिका घेतात या बाबत उत्सुकता आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या आमदारांपैकी नऊ जणांनी आज ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत आमदारांनी सध्याच्या पाच पैकी चार कॅबिनेट मंत्र्यांना बदलण्याची जोरदार मागणी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. एक राज्यमंत्री सोडले तर मराठवाड्याला शिवसेनेने प्रतिनिधीत्व दिलेले नाही, याकडे या आमदारांनी लक्ष वेधले.

सरकारमधून बाहेर पडायचे की नाही याबाबतचा निर्णय आपण घ्या पण सरकारमध्ये राहायचे असेल तर मराठवाड्याला न्याय द्या, असे साकडे या आमदारांनी घातले. सरकारबाबत काय निर्णय घ्यायचा ते माझ्यावर सोडा. काही मंत्र्यांना बदलावे ही आमदारांची भावना आहे. त्या बाबत मी योग्यवेळी निर्णय घेईन, असे ठाकरे यांनी आमदारांना सांगितल्याची माहिती आहे. ठाकरे यांना भेटलेल्या आमदारांमध्ये सध्या पक्षात नाराज असलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचाही समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून तीन दिवसांच्या विदेश दौºयावर रवाना झाले. गेल्या महिन्यात त्यांचा हा दौरा रद्द झाला होता. त्यावेळी शिवसेनेचे नेते सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत जाणार होते. मात्र, आज मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळात केवळ अधिकाºयांचा समावेश होता.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार