शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना निरोप; कधीही कॉल करा, पण सावंतवाडीतून बोलतोय सांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 13:24 IST

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद साधारण सतरा वर्षे रंगत आहे. राणे भाजपमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री झाल्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे

रत्नागिरी : गुरुवारी दुपारच्या वेळेत येथील शासकीय विश्रामगृहात चक्क नारायण राणे यांनी निधीसाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवर संपर्क केला. ‘‘राणे, तुम्ही कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन; पण, फक्त सावंतवाडीतून बोलतोय असे सांगा,’’ असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. राजकीय वर्तुळात धक्कादायक ठरू शकणारा हा प्रकार घडला रत्नागिरीत. फक्त फरक एवढाच होता की, मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणारे नारायण राणे आहेत सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य.

केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) आणि शिवसेना(Shivsena) यांच्यातील वाद साधारण सतरा वर्षे रंगत आहे. राणे भाजपमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री झाल्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे. गेल्या काही महिन्यांत तर या वादाने टोक गाठले आहे. अशा पार्श्वभूमीवर नारायण राणे शिवसेनेच्या राज्यातील मंत्र्याची निधीसाठी भेट का घेतील? मुख्यमंत्र्यांशी फोनवर का बोलतील? पण हे गुरुवारी रत्नागिरीत घडले. फक्त ‘हे’ राणे ‘ते’ राणे नव्हते.

मंत्री सामंत यांची भेट घेणारे हे नारायण राणे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे. ते माजी पंचायत समिती सदस्य आहेत. निधीसाठी त्यांनी सामंत यांची भेट घेतली. राणे माझ्याकडे निधी मागण्यासाठी आले असल्याची मिश्किल प्रतिक्रियाही यावेळी सामंत यांनी दिली. या भेटीनंतर राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. ‘तुम्ही कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन; पण, फक्त सावंतवाडीतून बोलतोय असे सांगा,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे राणे यांनी सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

नारायण राणे यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना फोन केला तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘त्या’ नारायण राणे यांचा मी फोन घेत नाही. तुम्ही फोन केल्यावर सावंतवाडीहून नारायण राणे बोलतोय, असे सांगा. मी फोन घेईन.’ पुढे राणे म्हणाले, ‘मला उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कुणाचीही गरज पडत नाही. मी त्यांना थेट भेटतो. यावेळी त्यांनी ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधनही अभिमानाने दाखविले. उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना