शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

पाच वर्षे नव्हे, पाच पिढ्या महाविकास आघाडीचे सरकार राहील, उद्धव ठाकरेंना विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 17:51 IST

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारबाबत मोठे भाष्य केले आहे.

नागपूर - महाविकास आघाडीमधील आम्ही घटकपक्ष एकदिलाने एकत्र आलो आहोत. त्यामुळे  पुढची पाच वर्षेच नाही तर पुढील पाच पिढ्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत राहील, असा विश्वास मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आले आहेत. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या सत्कारानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सरकारच्या दीर्घकाळ चालण्याबाबत विश्वास व्यक्त केला.  

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. या अधिवेशनासाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि त्यांचे मंत्रिमंडळ नागपूरमध्ये दाखल झाले आहे. आज नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीकडून सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले, ते म्हणाले की,  महाविकास आघाडीमधील आम्ही घटकपक्ष एकदिलाने एकत्र आलो आहोत. त्यामुळे  पुढची पाच वर्षेच नाही तर पुढील पाच पिढ्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत राहील. आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला काहीही चिंता करण्याची गरज नाही. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी  देशाला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे सरकार आणि शासन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार देईल, असे आश्वासनही दिले. 

 दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीचं सरकार हे स्थगिती सरकार आहे. अद्याप या सरकारने खातेवाटपही केलं नाही, त्यामुळे नेमके कुणाला प्रश्न विचारायचे असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच, शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार, सरसकट कर्जमाफी कधी होणार याचा किमान कार्यक्रम तरी जाहीर करावा, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  निवडणूक काळात या राजकीय पक्षांकडून जी सर्व आश्वासनेच होती, तीच आठवण आम्ही करून देत आहोत. सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये, हे सरकार स्थगिती सरकार असून महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाल्याचं दिसत आहे. सरकारच्या भूमिकेमुळे राज्यात असंतोष असून स्थगिती अशीच राहणार का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीShiv SenaशिवसेनाGovernmentसरकार