उद्धव ठाकरे आणि माफी? प्रश्नच नाही : शिवसेना
By Admin | Updated: September 27, 2016 20:09 IST2016-09-27T19:51:37+5:302016-09-27T20:09:44+5:30
'सामना'तील व्यंगचित्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही आणि त्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं शिवसेनेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.

उद्धव ठाकरे आणि माफी? प्रश्नच नाही : शिवसेना
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - 'सामना'तील व्यंगचित्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही आणि त्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं शिवसेनेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.
व्यंगचित्राच्या मुद्ययावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या निवासस्थानी बैठक बोलवली होती, बैठकीनंतर त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. त्यामध्ये व्यंगचित्राबाबत शिवसेनेने आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
व्यंगचित्रावरुन राजकारण करण्यामागे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा हात असल्याचा आरोप सुभाष देसाई यांनी केला. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले, व्यंगचित्राच्या मुद्यावरुन धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील राजकारण करत आहेत. त्यांनी मराठा समाजाला भडकावण्याचे उद्योग बंद करावे असे सुभाष देसाई यांनी सांगीतले.
आणखी वाचा - व्यंगचित्राचे पडसाद, संभाजी ब्रिगेडचा 'सामना' कार्यालयावर हल्ला