शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

उद्धव-पवार भेटीने राजकीय तर्कवितर्क , सत्तेबाहेर पडणार की राणेंना रोखण्याची खेळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 5:53 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दहा दिवसांपूर्वी भेट घेतल्याचे समोर आल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दहा दिवसांपूर्वी भेट घेतल्याचे समोर आल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार, की नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करू नये, यासाठी आणलेला हा दबावआहे, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.शिवसेना सत्तेत समाधानी दिसत नाही, असे सांगत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दहा दिवसांपूर्वी भेटीला आले होते, असा गौप्यस्फोट खा. पवार यांनी आज कर्जत येथे केला. ते म्हणाले, उद्धव यांच्या वडिलांपासून आमच्यात सुसंवाद आहे. परवाच्या भेटीत आमच्यात बºयाच विषयांवर चर्चा झाली. पण मला ते सत्तेत राहून समाधानी वाटले नाहीत. अर्थात, सरकारचा लगेच ते पाठिंबा काढतील असे नाही. पण जर कुणी सत्तेतून बाहेर पडले तर कुणालाही मदत करण्याची आमची भूमिका नाही,अशी गुगलीही पवार यांनी टाकली.उद्धव-पवार भेटीमागे राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश असल्याची चर्चा सुरू झाली.त्यावर, ‘मी मंत्रिमंडळात प्रवेश केला तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, कारण तो घाबरट पक्ष आहे’, अशी टीका राणे यांनी केली.शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेस असे एकत्र येऊन जर राज्यात सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव आला तर पक्षांतर्गत नेत्यांशी आणि समविचारी पक्षांशी बोलूनच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उद्धव-पवारांच्या भेटीवर भाजपामधील एका ज्येष्ठ नेत्याने वेळीच माहिती दिली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना अस्वस्थ होती. त्या वेळीही उद्धव यांनी पवारांची भेट घेतली होती. पृथ्वीराज चव्हाण, मोहनप्रकाश या काँग्रेस नेत्यांशी माझे बोलणे झाले आहे, आपण एकत्र यऊन सरकार बनवू असा प्रस्ताव दिला होता. मात्र पवारांनीतो फेटाळला होता. आता राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून शिवसेनेतअस्वस्थता असताना नेमकी वेळ साधत पवारांनी ही माहिती माध्यमांना दिल्याचा दावा या नेत्याने केला.पवारांच्या कथित ‘भेटी’वर शिवसेनेकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र काही दिवसांपूर्वीपवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यावर ते का बोलत नाहीत, असा सवाल शिवसेनेच्या एका नेत्याने केला आहे.शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याभेटीची गुप्तता १० दिवसांपर्यंत का बाळगली? आजच त्याबाबत आपल्या भाषणात उल्लेख का केला, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चासुरू होती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे